मोहोळ - शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला शाळेतच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना औंढी ताल, मोहोळ येथील शिंदे वस्ती शाळेत दुपारी एक वाजता घडली. अंजली सागर घोडके वय 24 रा वरकुटे असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, अंजली घोडके या औंढी येथील शिंदे वस्ती शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान गुरुवार ता 23 रोजी दुपारी एक वाजता त्यांना चक्कर आली, त्यामुळे त्यांना तातडीने मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी अंजली यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची खबर महेश मधुकर घोडके (वय-37, रा. वरकुटे) यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.