Maharashtra News Live Updates: दोन खुनाच्या घटनेने नागपूर हदारलं
Saam TV January 24, 2025 12:45 AM
शिवाजी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न

शिवाजी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न.

फायरवॉलमुळे हॅकरचा प्रयत्न फसला.

काही दिवसापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून कागदपत्र डाऊनलोड करण्याचा प्रयत्न देखील झाला होता.

नागपुरात एकाच रात्री दोन खुन

नागपुरात एकाच रात्री दोन खुनाचा घटना.

नागपुरात मध्य रात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या दोन घटना घडल्यात.

एक घटना सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत तर दुसरी घटना वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय.

या घटना एकाच रात्री दोन खुनाच्या घटनांनी नागपुरात वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधले.

वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या कथित ऑडीओ क्लिप प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत करणार सत्यता पडताळणी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची मागणी

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी आमदार प्रभू यांनी लिहिले राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र

मराठी माणूस आणि मराठी भाषा यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य अतुलनीय

नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान..

नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत मला काही माहिती नाही. मंत्रिमंडळात मी नाही, जे दिले चांगली गोष्ट आहे, स्थगिती का दिली काही कल्पना नाही. कोणाची काही मागणी आहे, मला कल्पना नाही. चांगला पालकमंत्री यावे आणि या जिल्ह्याचा कल्याण करणारा असावा, असं आमदार छगन भुजबळ म्हणालेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज पोलीस चौकशीच्या फेऱ्यात?

एसआयटी आणि सीआयडी अधिकाऱ्यांकडून केज येथील पोलीस उपअधीक्षक कमलेश मीना यांच्यासोबत चर्चा सुरू झालीय. देशमुख हत्या प्रकरणाविषयी काय माहिती मिळते का? याची चौकशी सुरूय. देशमुख कुटुंबासह राजकीय नेत्यांनी केज पोलिसांवर संशय व्यक्त केला होता. त्याविषयी देखील पोलीस उपअधीक्षक कमलेश मीना आणि अधिकार्यांची चौकशी सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

नेरूळच्या खासगी शाळेला बॉम्बनं उडवण्याची धमकी, परिसरात खळबळ

अंधेरीनंतर नवी मुंबईतील नेरुळच्या रयान इंटरनॅशनल शाळेला बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलद्वारे शाळेला बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांच्या श्वान पथकानं शाळेची पाहणी केली. मात्र, पाहणी दरम्यान कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही.

मिरज सांगली रस्त्यावर वाहनाचा भीषण अपघात, ३ जण जखमी

मिरज सांगली रस्त्यावर चारचाकी वाहनानं भरधाव वेगाने येत पाच वाहनांना उडवलंय. यात वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे. तर तीन वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मिरज सांगली रस्त्यावर सेवासदन हॉस्पिटल जवळ घडलाय. अपघात घडल्यानंतर सांगलीकडून मिरजेत येणाऱ्या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती.

बॅनरबाजीवरून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा, सोलापुरात गोरे समर्थकांची पुन्हा बॅनरबाजी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेने हटवल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. सोलापूर महापालिकेकडून बॅनर उतरावण्यात आले होते. हे बॅनर उतरवण्यात आल्यानंतर त्याच जागी कार्यकर्त्यांनी पुन्हा बॅनर लावले आहेत. त्यामुळे लावण्यात आलेले बॅनर महापालिका हटवते की तसेच ठेवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ram Gopal Varma : राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांची तुरुंगवास

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या खूप काळापासून चर्चेत आहेत.

सध्या राम गोपाल वर्मा कोर्टकचेरीमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत.

सात वर्षे जुन्या खटल्याबाबत न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

त्यामुळे त्यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नो फ्लाय झोन

देशाचे गृहमंत्री अमित शहा २४ जानेवारीला नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात नो फ्लाय झोन आहे. अमित शाह यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने आदेश दिले आहेत. कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लाइडर्स, पॅरा मोटर्स, हॉट एअर बलून, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट परवानगी शिवाय उडवण्यास मनाईचे आदेश देण्यात आले आहे.

सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेने हटवल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. सोलापुरातील सात रस्ता परिसरात नो डिजिटल झोन आहे. तरीही भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर परवानगीशिवाय लावले होते. त्यामुळे हे बॅनर महापालिकेनं कारवाई करत हटवले. यावेळी तैनात असलेले पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बचाबाची झाली. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलं. याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

नाशिकमध्ये भाजप आमदार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यावर असताना भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत नाशिक विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे मैदानात उतरल्या होत्या. त्यावेळी मनसेच्या उमेदवार यांनी माघार घेतली होती.

कराडमध्ये गॅस पाईप तयार करणाऱ्या कंपनीला आग, आगीमुळे सर्वत्र काळ्या धुराचे लोट

कराड गोटे गावाजवळ असलेल्या पुणे बेंगलोर हायवेवरील कंपनीला मोठी आग लागली आहे. गॅस पाईप तयार करणाऱ्या कपंनीच्या गोडाऊनला आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीमुळे सर्वत्र काळ्या धुराचे लोट पाहायला मिळत आहे. आगीचं कारण अस्पष्ट असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.

जळगावातील पुष्पक एक्सप्रेस अपघाताला रेल्वेमंत्री जबाबदार- किशोरी पेडणेकर

जळगावातील पुष्पक एक्सप्रेस अपघाताप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी रेल्वेमंत्र्यांवर संताप व्यक्त केलाय. जळगावातील पुष्पक एक्सप्रेस अपघात खूप भयानक होतं. या रेल्वे अपघाताला रेल्वेमंत्री आणि त्यांच्या बरोबरीने काम करणारे प्रत्येक जण जबाबदार आहेत. या रेल्वे अपघातात अनेकांचे मोठे नुकसान झालं आहे.

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि रोख रक्कम केली लंपास

धुळे शहरातील नकाणे रोडवरील उन्नती नगरात चोरट्यांनी सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बंद घरात शिरून चोरी केली आहे..

कुटुंबीय उपचारासाठी नाशिकला गेले असताना चोरट्यांनी फ्लॅट बंद असल्याचा फायदा उचलत फ्लॅटचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला

देवघरातील चांदीचे दागिने आणि कपाटातील सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड तसेच घरातील इतर मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत..

कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनांनी केले अभिवादन

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नांदेड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील एकमेव असलेला नांदेड शहरातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान पुतळा परिसरात रक्तदान शिबीर घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले

पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या झोपडपट्टीला आग, 10 लाख रुपयाची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक

पिंपळे गुरव परिसरातील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्रा शेड झोपडपट्टीला आज सकाळी साडेअकरा वाजता दरम्यान आग लागून दहा लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

जळालेल्या रोख रकमेचे एक्सकल्युसिव व्हिडियो साम टीव्ही न्यूज च्या हाती लागले आहेत. पत्रा शेड झोपडपट्टीला लागलेली आग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आहे.

मात्र या आगीत पत्रा शेडमध्ये राहणाऱ्या बिगारी कामगारांचा मोठा आर्थिक नुकसान झाला आहे.

पत्रा शेडला आग नेमकं कोणत्या कारणामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेल नाही आहे

अज्ञात चौघांनी केली पेट्रोल पंपावर लोखंडी रॉड ने कामगारांना मारहाण, सीसीटीव्ही मध्ये घटना कैद

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील माळवटा परिसरात एका पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञातांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास लोखंडी रॉड, दगडाच्या साह्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

या वेळी पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये साहित्याची देखील तोडफोड केली आहे.

डिझेल भरण्याच्या शुल्लक कारणावरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे .

या मारहाणीची व तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून चार अज्ञात आरोपींविरूद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत पोलीस या आरोपींचा आता शोध घेत आहेत.

माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा अप्रत्यक्ष मोहिते पाटलांना इशारा

माळशिरसच काय पण सोलापूर जिल्ह्यातील एकाही भाजप पदाधिकाऱ्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा थेट इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना दिला आहे.

भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला असतानाच यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना हा थेट इशारा दिला आहे.

अकलूज येथील भाजप तालुका अध्यक्षाच्या अंगावर गाडी घातल्याचे टिव्ट राम सातपुते यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा इशारा दिला आहे.

वाल्मीक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज घेतला मागे

खंडणी प्रकरणात आज केज न्यायालयात होणार होती सुनावणी

सरकारी वकील शिंदे व तपास अधिकारी अनिल गुजर यांची देखील होती उपस्थिती

वाल्मीक कराडचे वकील एडवोकेट अशोक कवडे यांनी सुनावणीपूर्वीच जामीन अर्ज घेतला मागे

Pimpri-Chinchwad: बटरफ्लाय ब्रिजची किंमत 25 कोटी वरून वाढून आता 40 कोटी रुपये

बटरफ्लाय ब्रिज काम 2017 मध्ये घेण्यात आलं त्यावेळेस पुलाची एकूण किंमत पंचवीस कोटी रुपये इतकी होती.

मात्र ती आता 40 कोटी रुपये इतकी झाली आहे. आणि सात वर्ष पूर्ण होऊन देखील पुलाचं काम अद्याप पूर्ण झालं नाही.

107 मीटर लांब आणि 18 मीटर रुंदी असलेल्या या पुलाचे काम हाती घेतल्यापासून 18 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते.

मात्र विहित मुदतीत काम पूर्ण न झाल्यामुळे 2022 काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ देऊनही अद्याप बटरफ्लाय ब्रिजचे काम पूर्ण झाल नाही.

शिवाय 25 कोटी चा खर्च 40 कोटींवर गेला कसा याची सखोल चौकशी करण्याची मागणी पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केल आहे.

अपघाताचा बनाव करत प्रेयसीने आपल्या काही मित्रांच्या मदतीने 28 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना

बालाजी उर्फ बाळू मंचक लाडे असं हत्या करण्यात आलेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे.

प्रियकर बालाजी लांडे दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने प्रेयसीने तिच्या काही आपल्या मित्रांच्या मदतीने मृतक बालाजी लांडे याला घरकुलच्या 303 सदनिकेत त्याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि तो मयत झाला असल्याची खात्री केली...

आणि त्यानंतर त्याच्या अपघात झालाच बनाव करत त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयात बालाजीला उपचारासाठी नेत असताना प्रेयसीच्या मित्रांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मयत बालाजीचा अपघात झाला आहे असा खोटा बनाव करून त्याला पिंपरी चिंचवड शहरातील वाय सी एम रुग्णालयात दाखल केलं....

Dhule News: कामाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका तरुणाला चार ते पाच जणांकडून बेदम मारहाण

कामाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका तरुणास चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर येथे उघडकीस आला आहे...

या तरुणाला मारहाण करतानाचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे...

कामाचे पैसे वारंवार मागून देखील मिळत नसल्याने संबंधित तरुणाने आपले पैसे लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी संबंधित व्यक्तीकडे केली होती....

वारंवार पैसे मागत असल्याचा राग अनावर झाल्यानंतर संबंधिताने तरुणास बोलावून घेतले, व त्यास चार ते पाच जणांनी एकत्रित येऊन जबर मारहाण केली आहे....

जिल्ह्यातील महाविकास आघाडीला खिंडार, पदाचे राजीनामे देत भाजपात प्रवेश

चिखली विधान सभा मतदारसंघात आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला एक नवा आयाम मिळाला असून विधानसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या विजयानंतर आ. महाले यांच्या नेतृत्वाला अधिक लोकमान्यता मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याशिवाय मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (sp) या पक्षांना मोठे हादरे बसले आहेत..

त्यामुळे जिल्हतातील महाविकास आघाडीला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे...

Sharad Pawar And Ajit Pawar: आठ दिवसांत शरद पवार आणि अजित पवार दुसऱ्यांदा एकत्र

- आठ दिवसांत शरद पवार आणि अजित पवार दुसऱ्यांदा एकत्र

- ⁠व्हीएसआयच्या कार्यक्रमात दोघांची आसनव्यवस्था शेजारी-शेजारी

- ⁠आठ दिवसांपूर्वीच बारामतीत दोघे शेते कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात आले होते एकत्र

- ⁠तिथे दोघांची आसन व्यवस्था शेजारी नव्हती

- ⁠व्हीएसआयच्या कार्यक्रमात मात्र दोन्ही नेते शेजारी

- ⁠या दोघांच्या शेजारी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विजयसिंह मोहीते पाटील यांची आसन व्यवस्था

Shirdi Police: दरोडेखोरांना चोप देणाऱ्यांवर शिर्डी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून सराफ दुकानावर दरोडा प्रकरण...

पळ काढण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्यांना धाडस दाखवून प्रतिकार करत जमावाने दिला होता चोप...

जमावाच्या मारहाणीत दोन चोरटे झाले होते जखमी.. तर एकजण फरार...

जमावाच्या धाडसामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला...

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील 21 जानेवारी रोजी सायंकाळची घटना...

सराफ दुकानावर दरोड्याची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद...

जमावाने चोप दिलेल्या दोघा चोरट्यांवर शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू...

मात्र चोरट्यांना चोप देणाऱ्या अज्ञात दहा ते पंधरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल..

थंडी जोर कमी होताच लिंबुच्या दरात झपाट्याने वाढ....

गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला असून तापमानात वाढ झाली आहे यायचं परिणाम आता भाजीपाल्याचा दरात देखील पाहायला मिळत आहे थंडी कमी झाल्याने लिंबूच्या दरात झपाटयाने वाढ झाली आहे किरकोळ बाजारात 60 रुपये किलो दराने मिळणारा लिंबू 100 रुपये किलो दराने मिळत आहे

रायगड मध्ये ठाकरे सेनेला मिळणार मोठा धक्का

महाड मधील स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर

० स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या

० विधानसभेला ठाकरे सेनेकडून लढविली होती निवडणूक

० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश

आठ दिवसांत शरद पवार आणि अजित पवार दुसऱ्यांदा एकत्र

⁠व्हीएसआयच्या कार्यक्रमात दोघांची आसनव्यवस्था शेजारी शेजारी

- ⁠आठ दिवसांपूर्वीच बारामतीत दोघे शेते कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात आले होते एकत्र

- ⁠तिथे दोघांची आसन व्यवस्था शेजारी नव्हती

- ⁠व्हीएसआयच्या कार्यक्रमात मात्र दोन्ही नेते शेजारी

- ⁠या दोघांच्या शेजारी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विजयसिंह मोहीते पाटील यांची आसन व्यवस्था

अखेर गडकरींनी दिलेला अल्टिमेटम संपला... तरीही काम अपूर्णचं...

- नागपूर विमानतळातील धावपट्टीच्या रीकार्पेटिंगचे 23 डिसेंबरला कामाची पाहणी करत गडकरीनी महिनाभराचा अल्टिमेटम दिला होता... पण अलटीनेटम संपूर्ण काम मात्र अपूर्ण आहे

- धावपट्टीच्या रीकार्पेटींचे काम साठ टक्केच पूर्ण झाले आहे... काम पूर्ण होण्यासाठी 31 मार्च पर्यंतची मुदत मिळावी अशी अपेक्षा रिकार्पेटिंगचे काम करणाऱ्या के.जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची आहे...

Pune News: कात्रजमध्ये पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला मारणार; साडेतीन लाखाची रोकड लूटण्याचा प्रयत्न

कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीआहे.चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये कामगार जखमी झाला आहे.कात्रज कोढवा रोडवरील एम.के.एन्टरप्रायझेस इंडीयन पेट्रोल पंपावरील दिवसभराची जमा झालेली ३,४६,०००/- रुपये रोख रक्कम ही बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना अनोळखीन तीन मुलांनी त्यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण व दुखापत करुन त्यांची बॅग जबरदस्तीने हिस्कावण्याचा प्रयत्न केला आहे.

कन्नड तालुक्यातील सायगव्हाण गावात मेडिकल चालकाला बेदम मारहाण

औषध विकत घेण्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण

मेडिकल चालकाला बेदम मारहाण करत मेडिकलचीही केली तोडफोड

मारहाण आणि तोंडफोडीचा सीसीटीव्ही आला समोर

तोडफोड करणाऱ्या आरोपीवर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाहेरून येऊन गावात मेडिकल चालवत असल्यामुळे केली मारहाण

बंजारा समाजातील मेडिकल चालकाला उच्चवर्गीय समाजातील तरुणांकडून मारहाण

मारहाणीमुळे कन्नड तालुक्यात खळबळ

धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अखेर लागला मुहूर्त

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये सापडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त लागला आहे.नुतन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये 26 जानेवारी दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 26 जानेवारी ला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune News: शेतकऱ्यांचा स्वप्नांचा चिखल, टोमॅटोने दर १०० रुपयांवरून ५ रुपयांवर

टोमॅटोने केला शेतकऱ्यांचा स्वप्नांचा चिखल

पुण्याच्या बाजारात कवडीमोल भाव उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघेना

गेल्या वर्षी चांगली कमाई करून देणाऱ्या टोमॅटो ने यावर्षी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे

गेल्या वर्षी 100 रुपयांपर्यंत टोमॅटोचा दर यंदा थेट 5 रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल झाल

आवक वाढल्याने पुणे मार्केट यार्ड मधील बाजारात टोमॅटोचा ढीग लागत आहे

Pune News: पुण्यात थेट सोसायटीमध्ये जात चोरट्यांनी हिसकावली महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन

पुण्यात थेट सोसायटीमध्ये जात चोरट्यांनी हिसकावली महिलेची सोन्याची चेन

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली महिलेची सोन्याची चेन

पुण्यातील आणखी एक घटना सी सीटव्ही मध्ये कैद

पुण्यातील 24 तासात अशी दुसरी घटना.

थेट सोसायटीच्या पार्किंग मध्ये जात चोरट्यांचा प्रताप

पुण्यातील कर्वेनगर पाठोपाठ आता कोथरूड भागात सुद्धा समोर

Bhandara News: भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावर दुचाकीला अपघात, महिला गंभीर जखमी

भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराचा ब्रेकर आणि खड्ड्यांमुळे वाहनावरील ताबा जाऊन अपघात घडल्याची घटना घडली.

पुष्पा राजेश दुर्गे वय 37 राहणार भीमनगर नागपूर हे आपल्या पतीसोबत दुचाकीने नागपूर वरून कारधा येथे जात असताना हा अपघात झाला.

वैनगंगा नदीव पुलावर ब्रेकर आणि खड्ड्यांमुळे त्यांच्या मोटार सायकलचा ताबा सुटला आणि अपघात घडला.

दरम्यान पुष्पा दुर्गे यांना डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून जखमी महिलेला तत्काळ भंडारा जिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.