अभिनेता शंशाक केतकरने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याने सर्वांना लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान शंशाकने आता एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शशांक आणि प्रियांकाला एक गोड मुलगी झाली आहे.
काही दिवसापूर्वी शंशाकने सोशल मीडियावर पोस्ट करत बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. शशांक आणि पत्नी प्रियांका यांनी खास मॅटर्निटी फोटोशूट करत आई-बाबा होणार असल्याचा आनंद त्यांनी सगळ्यासोबत शेअर केला होता. दरम्यान आता शंशाक केतकरला एक गोड मुलगी झाली आहे. त्याने व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, 'आता खऱ्या अर्थानं कुटुंब पूर्ण झालं. घरात लक्ष्मी आली.'
शशांक केतकरने लेकीच नाव काय ठेवलं?शशांकने 4 डिसेंबर 2017 मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं होतं. शशांक आणि प्रियांका यांना 2021 मध्ये पहिलं बाळ झालं. त्यांनी मुलाचं नाव ऋग्वेद ठेवलं. आता शंशाकला दुसरी गोड मुलगी झाली आहे. त्याने 'हम दो हमारे दो' असं म्हणत मुलीचं नाव 'राधा' ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याने मुलीचं नाव जाहीर केलं आहे.
शशांकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. त्या स्टोरीमध्ये त्याने प्रियांका, शशांक, ऋग्वेद आणि राधा अशी चौघांची नावं लिहिलेली आहे. दरम्यान शंशाकच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. अनेक मराठी कलाकरांनी त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.