Raigad Politics : रायगडात शिवसेना-राष्ट्रवादीत वाक् युद्ध, उमेदवार पाडण्यावरुन तटकरे-गोगावलेंमध्ये जुंपली
Saam TV January 24, 2025 04:45 AM

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Raigad Politics : राज्यात पालकमंत्रिपदावरुन झालेला तिढा काहीप्रमाणे सुटला आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही कायम आहे. रायगड जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरुन मोठा राडा झाला. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरेंची निवड करण्यात आली. दरम्यान यामुळे शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले. वाद वाढत गेल्याने रायगड पालकमंत्रिपदाबद्दलच्या निर्णयाला स्थगिती दिली.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताविस्तारावरुन घटक पक्षांमध्ये जुंपली असल्याचे चित्र पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यातही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्रिपदाच्या विस्तारानंतर रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यात आणखी भर पडली आहे.

रायगडच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले आहेत. निवडणूक काळात युतीचा धर्म न पाळता शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे काम राष्ट्रवादीने केले असे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे. याला यांनी प्रतिउत्तर दिले आहे. 'माझ्यावर ज्यांनी निराधार आरोप केले, त्यांचं पुढं काय झालं हे सर्वांनी पाहिलंय', असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर नीही प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही ऐरेगैरे नाही, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत हे त्यांनी बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगावं' असे आव्हान भरत गोगावले यांनी दिले आहे. हा वाद धुमसत राहल्याने रायगडचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.