प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी
Inshorts Marathi January 24, 2025 04:45 AM

नवी दिल्ली, दि 23 : प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनीने अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले असून कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे.

0000

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.