Manoj Tiwary Accuses Gautam Gambhir : मागचे काही दिवस माजी क्रिकेटपटू व गौतम गंभीरचा जूना सहकारी मनोज तिवारी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत धक्कादायक खुलासे करत आहे. काही दिवसांपूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सच्या आत्तापर्यंतच्या विजयाचे श्रेय एकच्या ने घेतले, मला शिव्या दिल्या, त्याचबरोबर माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दलही गंभीर वाईट बोलला, असा आरोप मनोज तिवारीने केला होता. त्यानंतर आता तिवरीने गंभीरवर नवा आरोप केला आहे. गंभीरने मला आई-बहिणीवरून शिव्या देत मैदानाबाहेर मारण्याची धमकी दिल्याचे यावेळी तिवारीने सांगितले.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घडलेला किस्सा सांगितला, ज्यामध्ये तिवारीने सर्वाधिक धावा केलेल्या असताना गंभीर माझ्यावर विनाकारण चिडला. तिवारी म्हणाला, " मी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मैत्रिपूर्ण सामन्यात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्या सामन्यांनंतर गंभीर माझ्यावर प्रचंड चिडला होता. म्हणाला हा तुझा अॅटिट्यूड चालणार नाही. तुला परत कधी मी खेळवणार नाही. त्यानंतर वसीम अक्रमने आमच्यातील वाद मिटवला. नाहीतर त्या दिवशी आमच्यात मारामारी देखील झाली असती. "
त्यानंतर २०१५ मधील एका रणजी ट्रॉफी सामन्यातील किस्सा देखील तिवारीने संवादादरम्यान उघड केला. "मी त्यावेळी गार्ड घेत होतो. गंभीर स्लीपमध्ये उभा होता. स्लीपमधून गंभीर शिव्या द्यायला लागला. आई-बहिणीवरून शिव्या देत होता. शिव्या देता देता गंभीर म्हणाला तू संध्याकाळी भेट मी तुला मारतो. त्यावर मी म्हणालो संध्याकाळी का? आत्ताच मार, होऊन जावूदेत."
सौरव गांगुलीबद्दल देखील गंभीरने वाईट बोलल्याचे तिवारीने सांगितले. "सौरव गांगुली बोर्डवमध्ये आले असताना गंभीर त्याच्याबद्दल वाईट बोलत होता. तो पण जॅक आणि सोर्स वापरून बोर्डमध्ये आला. तू पण त्याच्या प्रमाणेच आहेस." तिवारीने सांगितले.
याआधी न्यूज १८ बंगालसोबत बोलताना गंभीरने PR द्वारे केकेआरच्या विजयाचे श्रेय घेतल्याचे सांगितले होते. तिवारी म्हणाला “आम्ही सर्वांनी एक युनिट म्हणून कामगिरी केली, गंभीरने एकट्याने केकेआरला विजेतेपद मिळवून दिले नाही. जॅक कॅलिस, सुनील नरेन आणि मी, सर्वांनी या विजेतेपदासाठी योगदान दिले. पण त्याचे श्रेय कोणी घेतले? एक वातावरण निर्माण करून PR च्या मदतीने गंभीरने हे श्रेय घेतले. ”