पुणे : पुण्यातील उच्चभ्रू अशा कोरेगाव पार्क परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या परिसरात राहणार्या 2 तरुणांकडून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडून मिनी कुपर ही महागडी गाडी जी या ड्रग्सची खरेदी विक्रीसाठी वापरण्यात आली होती, ती सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे. दोन्ही तरुणांचे वय अवघे 19 असून ते सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबातून येतात. कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात यांनी ड्रग्सची खरेदी आणि विक्री केल्याचं कबूल केलं आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रणव नवीन रामनानी आणि गौरव मनोज दोडेजा यांच्याकडून 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2 ग्रॅम 68 मि.ग्रॅम कोकेन तसेच 136 ग्रॅम 64 मि.ग्रॅम ओजीकुश गांजा हा अंमली पदार्थ यासोबतच विक्री करीता वापरत असलेल्या मिनी कुपर व ग्रैंड व्हीटारा या महागड्या कार तसेच दोन इलेक्ट्री वजन काटे व चार मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोथरुड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून आले होते. दरम्यान या वाढत्या घटना लक्षात घेता या घटनेनंतर आता चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड भागात घडलेल्या 2 घटनांची दखल घेत सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा, असे निर्देश दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, तपास जलदगतीने करुन चोरांच्या मुसक्या आवळा, असे निर्देशही यावेळी दिले. 2 दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याची चेन हिसकावून नेण्याचे व्हिडिओ समोर आला होता. यातील पहिली घटना कर्वेनगर परिसरातील नव सह्याद्री या भागात घडली, तर दुसरी घटना डी पी रोड येथील नचिकेत सोसायटी मध्ये घडली. यातील एका घटनेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चेन वर दुचाकी वरून आलेल्या एकाने हिसकावून नेली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..