महाराष्ट्रात सरकारी बसचा प्रवास महागणार, दरात 15 टक्के वाढ
Webdunia Marathi January 25, 2025 01:45 AM

राज्यात राज्य सरकार आता पैसे उभारण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबवत आहे. आता महाराष्ट्रात सरकारी बसचा प्रवास महागणार आहे. सरकारी बसच्या तिकिटांच्या दरात आजपासून 15 टक्के वाढ करण्यात आली. अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे.


गुरुवारी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली , त्यांनतर हा निर्णय घेण्यात आला.सरकार ने महाराष्ट्रात मोफत सेवा सुरु केली होती. या मोफत सेवेमुळे महाराष्ट्र सरकारच्या परिवहन सेवेला दरमहा 90 कोटी रुपयांचा तोटा होत होता. आता हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारने भाड़ेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ALSO READ:

तसेच मुंबईतील ऑटो टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टॅक्सीचे मूळ भाड़े पूर्वी 28 रूपये होते आता 31 रूपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ऑटोच्या सेवेची कीमत 23 रूपये होती आता 26 रूपये करण्यात आली आहे.


महिलांना निम्या क़ीमतीचे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या योजना भविष्यात देखील सुरु राहणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितले.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.