गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आर्थिक मदत केली जाते. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. नागरीकांना या सेवा त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरीता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष' सुरु करण्यात येणार आहे.
Restraining Order : पुणे ग्रामीण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूपुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ७ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
...तर गेल्या २ वर्षात 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' घेऊन इथेच का करार केला नाही?आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवालमाजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी दावोसमधील गुंतवणुकीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.ते म्हणाले,आताच्या मुख्यमंत्र्यांनी एवढी गुंतवणूक आणलीय, ज्यामुळे एसटीचे विलिनीकरण,लाडक्या बहिणीना पैसे.. अशी कामे होतील. पण सरकारने ज्या 54 करार कंपन्यांसोबत केले,त्यात विदेशी कंपन्या 11 आणि भारतीय कंपन्या 43 आहेत. त्यातही 31 कंपन्या या राज्यातल्या आहेत. एवढ्या जर राज्यातील कंपन्या असतील तर गेल्या २ वर्षांत मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊन इथेच का करार केला नाही? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मोठी बातमी! सर्वसामान्यांची 'लाईफलाईन' असलेल्या एसटी बसेसचा प्रवास महागलामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सर्वसामान्यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या प्रवासीदरात 14.95 टक्के इतकी वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ही भाडेवाढ 25 जानेवारीपासून लागू केली जाणार आहे. यापूर्वी 26 ऑक्टोबर 2021 रोजी भाडेवाढ करण्यात आली होती. परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी 1 जानेवारी 2025 रोजी परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
Torres Corruption Case News : ईडीने 21 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवलीटोरेस गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुल संचलनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने या प्रकरणात कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त करत 21 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवली आहेत
Satara News : साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं जंगी स्वागतनुकताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नियुक्तीला विरोध येथील जिल्हा बँकेच्या एका संचालिकेने केला होता. तसेच शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्री नियुक्तीवरून जिल्ह्यात नाराजी असल्याचे म्हटले होते. पण आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आगमन होताच क्रेनच्या साहाय्याने 50 फुटी फुलांच्या हार घालून स्वागत करण्यात आले आहे.
Shiv Sena UBT News : कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी मोठा धक्काकोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका पाठोपाठ एक धक्के बसत असून आता आणखी एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा सह संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाच्या पदासह सक्रिय सदस्यत्वचाही राजीनामा दिला आहे. यामुळे उत्तर रत्नागिरीत एकच खळबळ उडाली आहे.
Solapur Live : सोलापूर शहरात 29 जानेवारीला विद्युत पुरवठा खंडितसोलापूर शहरात विविध दुरुस्ती कामासाठी महावितरणकडून बुधवारी (ता.29) विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात अडखळा निर्माण झाला असून उजनी धरणातून होणारा उपसा बंद असणार आहे. यामुळे बुधवारसह पुढील एका रोटेशनसाठी शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात येणार आहे.
Tilari Dam : तिलारी धरणाच्या प्रश्नावर गोव्याच्या मुख्यमंत्री घेणार फडणवीस यांची भेटसिंधुदुर्गातील तिलारी धरणातून गोव्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र आज शुक्रवारी (ता. 24) कुडासे भोमवाडा येथे कालवा फुटला. यामुळे गोव्याला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. यासंदर्भात गोव्याच्या मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यांची भेट घेणार आहेत.
Solapur Live : शक्तिपीठ महमार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनमराठवाडा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्यावतीने नागपूर-गोवा हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी एक दिवशीय राज्यव्यापी धरणे आंदोन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुनम गेट येथे आज आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकारी व प्रांतधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
Maharashtra Live : गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणे ही सरकारची जबाबदारी : प्रकाश आबिटकरकोल्हापुर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण प्रकरण वादाचा मुद्दा बनला असून यावर कारवाई सध्या सुरू आहे. यादरम्यान पालमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. तर या सर्व कामाला आता गती येईल असेही म्हटले आहे.
Mumbai News : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे आता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू केला जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा देण्यासह आर्थिक सहाय्य दिले जाते. पण अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयाचे खेटे मारावे लागतात. यामुळे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु केली जाणा आहेत.
Chhagan Bhujbal News : नाराज भुजबळ भाजपाच्या वाटेवर? अमित शाह यांच्या एका कृतीने चर्चांना उतराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना महायुती 2.0 सरकारमध्ये घेतले नाही. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत आला असतानाच आता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या एका कृतीने याला दुजोरा मिळत असल्याचे म्हटले जात आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात शाह यांनी भुजबळ यांना बोलावून शेजारच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. यामुळेच आता नव्या चर्चांना उधान आले आहे.
Pratap Sarnaik News : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकगेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती ती भाडेवाढ गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तर 14.97 टक्के भाडेवाढ करण्यात आल्याची माहिती परिवहन खात्याचे प्रधान सचिव यांनी म्हटले आहे.
Mumbai News : मुंबईत मंत्रालयाजवळच्या झाडावर चढून तरुणाचे आंदोलन...मुंबईत मंत्रालयाजवळील झाडावर चढून एक तरुण आंदोलन करत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पोलिस त्या तरुणाला खाली उतरण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र तो तरुण भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन करत आहे.
Anil Bonde : बांगलादेशींना भारतात राहू दिले, तर ते कोणाच्या तरी जीवावर उठतील : अनिल बोंडेराज्यातील एमआयडीसी परिसरात अनेक जण बांगलादेशातून आलेले आहेत. जे टेक्स्टाईल युनीट चालवतात, त्यांनीही खात्री करूनच नोकर कामाला ठेवले पाहिजेत. तो पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे, हे पाहणे आवश्यक आहे. बांगलादेशींना भारतात राहू दिले, तर ते कोणाच्या ना कोणाच्या तरी जीवावर उठणार आहेत, त्यामुळे बांगलादेशींना परत पाठविण्याची वेळ आता आली आहे.
Shaktipeeth Highway : देवांच्या नावावर ठेकेदार जोपासण्याचे काम महायुती सरकार करत आहेदेवांच्या नावावर ठेकेदार जोपासण्याचे काम महायुती सरकार करत आहे. कोणत्याही शेतकऱ्याची, भाविकाची आणि वाहनधारकांची मागणी नसतानाही शक्तीपीठ करण्याचे षडयंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ठेकेदार, राज्यकर्ते मंत्री यांच्यात वाटप करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करत असेल तर सरकारमधील मंत्र्यांना आम्ही सांगलीत फिरू देणार नाही. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा सांगलीतील शेतकऱ्यांनी दिला.
Amit Shah : कृषिमंत्री असताना शरद पवारांनी काय केले?मालेगावच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. मालेगावमधील सहकार परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी शरद पवार यांना प्रश्न केला आहे. कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला आहे.
Ashish Shelar : महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचा सुपडा साफ होईल : आशिष शेलारशिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या ताकदीपेक्षा, ऐपतीपेक्षा आणि औकतीपेक्षा जास्त वल्गना केल्या. त्यांनी मुंबई पालिकेसाठी समोर या, असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत जे मंत्री, आमदार होते ते सर्व सोडून गेले. शिवसेनेत उद्धव ठाकरे हे एकटेच राहणार आहेत. अमित शहा यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईची जनता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला मूठमाती देईल आणि ठाकरे गटाचा सुपडा साफ होईल, असा दावा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केला.
Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासोबत दगाफटका करू नये : जरांगे पाटीलमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणातून मागे हटणार नाही. मात्र, मराठा आरक्षणासाठी उद्यापासून आंदोलन करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जरांगे पाटील हे शनिवारपासून (ता. 25 जानेवारी) आरक्षणासाठी उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासोबत दगाफटका करू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.
Saif Ali Khan Attacked : आरोपीच्या कोठडीत वाढअभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा आरोपी शहजाद यांच्या पोलिस कोठडीत २९ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीचा पोटो आणि सीसीटीव्हीचे फुटेज खासगी लॅबकडे पाठवण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती आणि अटकेतील आरोपी यांच्यात साम्य नाही. लॅबच्या अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल, असा दावा आरोपीचे वकील संदीप शेरखाने यांनी केला आहे.
Uddhav Thackeray Meeting News : जिल्हाप्रमुखांची बैठकशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची आज उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच पक्षाकडून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभर राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
Manoj Jarange Patil News : देशमुख कुटुंबीय जरांगेंच्या भेटीलासंतोष देशमुख यांचे कुटुंबीय अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे. जरांगे पाटील यांच्याकडून संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत.
MSRTC Bus Fire Live : धावत्या बसला आगकर्जतमधील मिरजगावातील क्रांती चौकात धावत्या एसटी बसला आग लागल्याची माहिती आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक पेट घेतला. या आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Waqf Board JPC Meeting : दहा सदस्य निलंबितवक्फ बोर्ड संसोधित बिलाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. त्यानंतर अध्यक्षांनी विरोधी पक्षाचे सर्व दहा सदस्य दिवसभरासाठी निलंबित केले. समितीच्या बैठकांच्या तारखांवरून हा गोंधळ झाल्याची माहिती आहे.
Bhandara Blast : आठ जणांचा मृत्यूभंडाऱ्यातली आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Shiv Sena News : ठाकरेंच्या शिवसेनेत फुटउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रत्नागिरीमध्ये मोठी फुट पडणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कुडाळमधील नेते बंड्या साळवी यांच्यासह ठाकरेंच्या सेनेतील अनेक पदाधिकारी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरेंसाठी कोकणात हा मोठा धक्का मानला जात आहे.
Amit Shah: अमित शाह नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखलकेंदीय गृहमंत्री अमित शाह नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात अमित शाह त्र्यंबकेश्वर मंदिराचे घेणार दर्शन असून शाह यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे दोघे देखील घेणार त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार आहेत.
Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर..केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह शुक्रवारी (ता. २४) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात ते महापूजा करतील. त्यानंतर अजंग वडेल (ता. मालेगाव) येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हेही शहा यांच्याबरोबर असतील. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
Bhandara News : भंडाऱ्याच्या जवाहरलाल येथील कारखान्यात भीषण स्फोटभंडाऱ्याच्या जवाहरलाल येथील आयुध निर्माण कारखान्यात स्फोट. स्फोट एवढा मोठा होता की त्या कंपनीची पूर्ण इमारत स्फोटात उद्धवस्त.
Transportation Travel Expensive: राज्यात वाहन प्रवास महागलाराज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत तिकीट दरवाढीला मंजूरी. एसटीची भाडेदरवाढ आजपासून लागू होणार. रिक्षा आणि टॅक्सीचाही प्रवास महागणार. रिक्षाचं किमान भाडे 23 रूपयांवरून 26 रूपये तर टॅक्सीचं किमान भाडे 28 रूपयांवरून 31 रूपये अशी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
Supriya Sule live: देवेंद्र फडणवीस हे एकटेच काम करताहेत"महायुतीचं सरकार येऊन आज 60 दिवस झाले. मात्र वन मॅन शो काम होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच काम करीत आहेत. बाकीचे कोण कुठं फिरत आहे, परदेशात फिरत मला माहीत नाही," असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या कोल्हापुरात माध्यमाशी बोलत होत्या.
Raj Thackeray live: राज ठाकरे आजच नाशिकहून मुंबईला रवाना होणारNashik News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहे.ते आजच मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. काल (गुरुवारी) राज ठाकरे नाशिमध्ये आले होतो. काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते आज मुंबईकडे होणार रवाना होतील असे समजते.
Sharad Pawar Live: काका-पुतण्यामध्ये काय चर्चा झाली.....राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गुरुवारी एकाच व्यासपीठावर बसले होते. कार्यक्रमानंतर काका- पुतण्यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला. अजित पवार यांच्या सोबत एका प्रकल्पाबाबत चर्चा झाली, असे शरद पवार म्हणाले. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.
Dharashiv Shivsena : धाराशिव शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताच्या निमित्ताने धाराशिव शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो गायब झाला आहे. जिल्हाप्रमुख सुरज सोळुंके यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून सांवत यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. तर माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे बॅनरवर फोटो आहेत. तर काल मुंबईतील शिवसेना मेळाव्याला तानाजी सावंत यांची गैरहजेरीची चर्चा रंगली होती त्यात आता या बॅनरबाजीमुळे शिंदेसेनेतील अंतगर्त वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
Yogi Adityanath : CM योगी दिल्लीत 14 सभा घेणारपूर्व आणि उत्तर दिल्लीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा घेणार असल्याची माहिती आहे. ते मुस्लिम बहुल क्षेत्रात या सभा घेणार असल्याची माहिती असून ज्या भागात दंगली झाल्या त्या भागात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी हिंदू फायर ब्रँड अशी ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.
Amit Shah : अमित शाह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणारकेंद्रिय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ते दर्शनासाठी जाणार आहे. मालेगावमधील सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. तर आजच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे शहांसोबत उपस्थित राहणार आहेत.