Maharashtra Political News Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगलीत फिरू देणार नाही : शक्तीपीठबाधितांचा इशारा
Sarkarnama January 25, 2025 03:45 AM
Anil Bonde : बांगलादेशींना भारतात राहू दिले, तर ते कोणाच्या तरी जीवावर उठतील : अनिल बोंडे

राज्यातील एमआयडीसी परिसरात अनेक जण बांगलादेशातून आलेले आहेत. जे टेक्स्टाईल युनीट चालवतात, त्यांनीही खात्री करूनच नोकर कामाला ठेवले पाहिजेत. तो पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे, हे पाहणे आवश्यक आहे. बांगलादेशींना भारतात राहू दिले, तर ते कोणाच्या ना कोणाच्या तरी जीवावर उठणार आहेत, त्यामुळे बांगलादेशींना परत पाठविण्याची वेळ आता आली आहे.

Shaktipeeth Highway : देवांच्या नावावर ठेकेदार जोपासण्याचे काम महायुती सरकार करत आहे

देवांच्या नावावर ठेकेदार जोपासण्याचे काम महायुती सरकार करत आहे. कोणत्याही शेतकऱ्याची, भाविकाची आणि वाहनधारकांची मागणी नसतानाही शक्तीपीठ करण्याचे षडयंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ठेकेदार, राज्यकर्ते मंत्री यांच्यात वाटप करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करत असेल तर सरकारमधील मंत्र्यांना आम्ही सांगलीत फिरू देणार नाही. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा सांगलीतील शेतकऱ्यांनी दिला.

Amit Shah : कृषिमंत्री असताना शरद पवारांनी काय केले?

मालेगावच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. मालेगावमधील सहकार परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी शरद पवार यांना प्रश्न केला आहे. कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला आहे.

Ashish Shelar : महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचा सुपडा साफ होईल : आशिष शेलार

शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या ताकदीपेक्षा, ऐपतीपेक्षा आणि औकतीपेक्षा जास्त वल्गना केल्या. त्यांनी मुंबई पालिकेसाठी समोर या, असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत जे मंत्री, आमदार होते ते सर्व सोडून गेले. शिवसेनेत उद्धव ठाकरे हे एकटेच राहणार आहेत. अमित शहा यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईची जनता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला मूठमाती देईल आणि ठाकरे गटाचा सुपडा साफ होईल, असा दावा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केला.

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासोबत दगाफटका करू नये : जरांगे पाटील

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणातून मागे हटणार नाही. मात्र, मराठा आरक्षणासाठी उद्यापासून आंदोलन करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जरांगे पाटील हे शनिवारपासून (ता. 25 जानेवारी) आरक्षणासाठी उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासोबत दगाफटका करू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.

Saif Ali Khan Attacked : आरोपीच्या कोठडीत वाढ

अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा आरोपी शहजाद यांच्या पोलिस कोठडीत २९ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीचा पोटो आणि सीसीटीव्हीचे फुटेज खासगी लॅबकडे पाठवण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती आणि अटकेतील आरोपी यांच्यात साम्य नाही. लॅबच्या अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल, असा दावा आरोपीचे वकील संदीप शेरखाने यांनी केला आहे.

Uddhav Thackeray Meeting News : जिल्हाप्रमुखांची बैठक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची आज उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच पक्षाकडून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभर राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

Manoj Jarange Patil News : देशमुख कुटुंबीय जरांगेंच्या भेटीला

संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे. जरांगे पाटील यांच्याकडून संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत.

MSRTC Bus Fire Live : धावत्या बसला आग

कर्जतमधील मिरजगावातील क्रांती चौकात धावत्या एसटी बसला आग लागल्याची माहिती आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक पेट घेतला. या आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Waqf Board JPC Meeting : दहा सदस्य निलंबित

वक्फ बोर्ड संसोधित बिलाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. त्यानंतर अध्यक्षांनी विरोधी पक्षाचे सर्व दहा सदस्य दिवसभरासाठी निलंबित केले. समितीच्या बैठकांच्या तारखांवरून हा गोंधळ झाल्याची माहिती आहे.

Bhandara Blast : आठ जणांचा मृत्यू

भंडाऱ्यातली आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Shiv Sena News : ठाकरेंच्या शिवसेनेत फुट

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रत्नागिरीमध्ये मोठी फुट पडणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कुडाळमधील नेते बंड्या साळवी यांच्यासह ठाकरेंच्या सेनेतील अनेक पदाधिकारी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरेंसाठी कोकणात हा मोठा धक्का मानला जात आहे.

Amit Shah: अमित शाह नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल

केंदीय गृहमंत्री अमित शाह नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात अमित शाह त्र्यंबकेश्वर मंदिराचे घेणार दर्शन असून शाह यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे दोघे देखील घेणार त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार आहेत.

Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर..

केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह शुक्रवारी (ता. २४) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात ते महापूजा करतील. त्यानंतर अजंग वडेल (ता. मालेगाव) येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हेही शहा यांच्याबरोबर असतील. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

Bhandara News : भंडाऱ्याच्या जवाहरलाल येथील कारखान्यात भीषण स्फोट

भंडाऱ्याच्या जवाहरलाल येथील आयुध निर्माण कारखान्यात स्फोट. स्फोट एवढा मोठा होता की त्या कंपनीची पूर्ण इमारत स्फोटात उद्धवस्त.

Transportation Travel Expensive: राज्यात वाहन प्रवास महागला

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत तिकीट दरवाढीला मंजूरी. एसटीची भाडेदरवाढ आजपासून लागू होणार. रिक्षा आणि टॅक्सीचाही प्रवास महागणार. रिक्षाचं किमान भाडे 23 रूपयांवरून 26 रूपये तर टॅक्सीचं किमान भाडे 28 रूपयांवरून 31 रूपये अशी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

Supriya Sule live: देवेंद्र फडणवीस हे एकटेच काम करताहेत

"महायुतीचं सरकार येऊन आज 60 दिवस झाले. मात्र वन मॅन शो काम होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच काम करीत आहेत. बाकीचे कोण कुठं फिरत आहे, परदेशात फिरत मला माहीत नाही," असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या कोल्हापुरात माध्यमाशी बोलत होत्या.

Raj Thackeray live: राज ठाकरे आजच नाशिकहून मुंबईला रवाना होणार

Nashik News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहे.ते आजच मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. काल (गुरुवारी) राज ठाकरे नाशिमध्ये आले होतो. काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ते आज मुंबईकडे होणार रवाना होतील असे समजते.

Sharad Pawar Live: काका-पुतण्यामध्ये काय चर्चा झाली.....

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गुरुवारी एकाच व्यासपीठावर बसले होते. कार्यक्रमानंतर काका- पुतण्यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला. अजित पवार यांच्या सोबत एका प्रकल्पाबाबत चर्चा झाली, असे शरद पवार म्हणाले. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.

Dharashiv Shivsena : धाराशिव शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताच्या निमित्ताने धाराशिव शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो गायब झाला आहे. जिल्हाप्रमुख सुरज सोळुंके यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून सांवत यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. तर माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे बॅनरवर फोटो आहेत. तर काल मुंबईतील शिवसेना मेळाव्याला तानाजी सावंत यांची गैरहजेरीची चर्चा रंगली होती त्यात आता या बॅनरबाजीमुळे शिंदेसेनेतील अंतगर्त वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

Yogi Adityanath : CM योगी दिल्लीत 14 सभा घेणार

पूर्व आणि उत्तर दिल्लीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा घेणार असल्याची माहिती आहे. ते मुस्लिम बहुल क्षेत्रात या सभा घेणार असल्याची माहिती असून ज्या भागात दंगली झाल्या त्या भागात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी हिंदू फायर ब्रँड अशी ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.

Amit Shah : अमित शाह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ते दर्शनासाठी जाणार आहे. मालेगावमधील सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. तर आजच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे शहांसोबत उपस्थित राहणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.