Maharashtra News: घरफोडी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील दोघांना जेरबंद करुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता. २५) ही कारवाई केली. संभाजी गौतम पवार (वय २२, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. संभाजीनगर) व गणेश वर्जा भोसले (वय २८, रा. थेरगांव, ता. पैठण, जि. संभाजीनगर) अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांना उमापूर (ता. गेवराई) येथून ताब्यात घेण्यात आले.
शिरुर (कासार) पोलिस ठाणे हद्दीतील जाटवड गावातील टेकीवस्तीवर ता. २७ डिसेंबर २०२४ रोजी बापु तुकाराम सिरसट व त्यांच्याच शेजारील चे शेजारी असलेले तुकाराम एकनाथ बडे यांच्या घरात पाच ते सहा दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवुन, काठीने मारहाण करत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अंमलदार विकास वाघमारे यांना जाटवड येथील दरोडा संभाजी पवार याने साथीदारांसोबत केला असून ते उमापूर येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन फौजदार सिध्देश्वर मुरकुटे व फौजदार श्रीराम खटावकर यांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांवर अलिकडे शिरुर कासारसह चकलंबा, गेवराई, तलवाडा पोलिस ठाण्यात घरफोडी व दरोड्याचे चार गुन्हे नोंद आहेत. तर, संभाजी पवार याच्यावर यापूर्वी तलवाडा, पाचोड, पैठण येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत.
तसेच गणेश वर्जा भोसलेवर पाचोड, करमाड, बिडकीन पोलिस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयरी, घरफोडी असे गुन्हे नोंद आहेत. तपासात या दोघांकडून घरफोडीचे दोन व दरोड्याचे दोन गुन्हे उघड करुन या चार गुन्ह्यांतील लुटलेल्या सोन्यांच्या दागिन्यासह दुचाकी असा पाच लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सिध्देश्वर मुरकूटे, फौजदार श्रीराम खटावकर, फौजदार तुळशिराम जगताप, कैलास ठोंबरे, मनोज वाघ, अशोक दुबाले, दिपक खांडेकर, राहुल शिंदे, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव, विकी सुरवसे, चालक सुनिल राठोड व सिध्दार्थ मांजरे यांनी ही कारवाई