Solapur: शेतात उसतोडी करून सातनदुधनी ते तळेवाड रस्त्याने चालत घरी जात असताना, शंकर पाटील यांच्या शेताजवळ शुक्रवारी रात्री ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार झाला.
विलास धोंडीराम पवार (वय ३४, रा. गांधीनगर तांडा, दुधनी) असे मृताचे नाव आहे. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतीच फिर्याद शशिकांत राजेश चव्हाण (वय ३०, रा. डिग्गेवाडी, ता. अक्कलकोट) यांनी दिली. फिर्यादीचा मावस भाऊ विलास धोंडीराम पवार हा जगन्नाथ हिरु जाधव यांच्या शेतात उसतोडी करून सातनदुधनी ते तळेवाडकडे चालत घरी जात असताना.
सातनदुधनी ते तळेवाडकडे जाणारे रोडवर शंकर भीमशा पाटील यांच्या शेताजवळ ट्रॅक्टर (एमएच १३/ईसी ०६५७)चा चालक याने रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून हयगयीने, भरधाव
वाहन चालवून फिर्यादीचे मावस भाऊ विलास पवार यास मागून धडक दिल्याने तो रोडवर खाली पडून त्याच्या डोक्यावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.
अज्ञात चालकाविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.