बातम्यांमधील शेअर्स : एल अँड टी, Adani Enterprises, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, Tata Motors, ब्लूडार्ट
मुंबई : बाजाराशी संबधीत अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज कोणत्या शेअर्सवर ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने व्होल्टास, एल अँड टी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, क्वेस कॉर्प, ब्लूडार्ट, अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, व्होल्टास या शेअर्सचा सामावेश आहे. आज या कंपन्या जारी करणार तिमाही निकालएल अँड टी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्या आज आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या म्हणजेच डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करतील. बजाज फायनान्सBajaj Finance ने डिसेंबर तिमाहीत १७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत ३,६३९ कोटी रुपयांच्या तुलनेत ४,२४७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. टाटा मोटर्सअग्रणी ऑटो कंपनी Tata Motors चा तिसऱ्या तिमाहीचा नफा स्ट्रीट अंदाजापेक्षा मोठ्या फरकाने चुकला आहे कारण त्याचा नफा २२ टक्क्यांनी वार्षिक घटून ५,४५१ कोटी रुपयांवर आला आहे. क्वेस कॉर्पQuess Corp ने तिसऱ्या तिमाहीत ८० कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात २६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, तर ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल १४ टक्क्यांनी वार्षिक वाढून ५५१९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ब्लूडार्टBlueDart ने तिसऱ्या तिमाहीत ८१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो वार्षिक तुलनेत ९ टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान, महसूल ९ टक्क्यांनी वाढून ११५२ कोटी रुपयांवर पोहोचला. अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरAfcons Infrastructure ला हिंदुस्तान गेटवे कंटेनर टर्मिनल कांडला कडून १,२८३ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी करार पत्र मिळाले. व्होल्टासऑक्टोबर-डिसेंबर २०२४ या कालावधीत Voltas ने १३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. दरम्यान, ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ३,१०५ कोटी रुपये होता.