Maharashtra Live Update : अंबरनाथमध्ये बिल्डरकडून जेसीबीने झाड पाडताना मोठी दुर्घटना
Saam TV January 31, 2025 12:45 AM
अंबरनाथमध्ये बिल्डरकडून जेसीबीने झाड पाडताना मोठी दुर्घटना

गॅस कर्मचाऱ्यांच्या डोक्यात झाड पडल्याने कर्मचारी गंभीर जखमी

तर अनेक गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर

पालिकेकडून बिल्डरवर अद्याप कोणतीही कारवाई नाही

आज पुण्यात एक ही जी बी एस रुग्णाची नोंद नाही, रुग्ण संख्या 130 वर स्थिर

आज पुण्यात एक ही जी बी एस रुग्णाची नोंद नाही

पुण्यात जी बी एस रुग्णांची संख्या १३०

यातील २५ रुग्ण पुणे शहरातील असून इतर ७४ रुग्ण पुणे महापालिकेच्या नव्याने समाविष्ट भागातील आहेत

एकूण रूग्णांपैकी २० रुग्ण व्हेंटिलेटर

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय यासह इतर रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू

मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल

6 दिवसाच्या उपोषणानंतर आज उपचारासाठी जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाले.

डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या चाचण्या देखील करण्यात येणार आहेत.

पनवेलमध्ये ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पनवेल मध्ये ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.

६३ वर्षीय जेष्ठ नागरिकाने केला लैंगिक अत्याचार.

खाजगी सोसायटीमधील लिफ्टच्या बाजूला असलेल्या भिंती लगत नराधमाने केला लैंगिक अत्याचार.

पनवेल मधील शेडुंग येथील घटना. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.

नराधम आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेय.

विजेच्या शाॅक लागुन दोन शेतमजुरांचा मृत्यू

ज्वारी पिकाला पाणी देत असताना विजेच्या शाॅक लागुन दोन शेतमजुरांचा मृत्यू

धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बलसुर शिवारातील घटना

तलावाजवळ शेतात पाणी देताना विजेचा करंट लागून ही दुर्देवी घटना घडली.

या घटनेमुळे परिसरात केली जातीय हळहळ व्यक्त, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी झाले दाखल.

पुण्याच्या पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची घोषणाबाजी

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज हंडा मोर्चा काढण्यात आला.

पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्या भागामधील पाण्याचा प्रश्न बिकट.

अधिकारी व ठेकेदार वादामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाल्याचा शिवसैनिकांचा आरोप

यासाठी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने हंडा मोर्चा काढण्यात आला.

महिला डोक्यावर हंडा घेऊन पुणे महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी

क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिक आक्रमक

आपण हे आंदोलन स्थगित करत आहोत. शक्यतो यापुढे आमरण उपोषण होणार नाही - मनोज जरांगे

काही लोक म्हणतील आंदोलनातून काय मिळालं .

आपण काही केलं तर त्यांना जमत नाही.

शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती

शिंदे समिती लगेच सुरू करायची

वंशावळ समिती गठीत करा , ती बंद पडली. राज्यातील आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या. सगे सोयरे अधिसूचना अंमलबजावण्यासाठी दोन-तीन महिन्याचा वेळ मागितला आहे.

त्यानंतरही नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करू, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे.

मुलीवरची काळी जादू काढतो म्हणत ज्येष्ठ महिलेला लाखो रुपयांचा गंडा

भोंदू बाबा ने घातला ज्येष्ठ महिलेला २९ लाखांचा गंडा

पुण्यातील बालेवाडी भागातील ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस

एका ६२ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे

यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Pune News: शाळेच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई

शाळेच्या आवारातील पानटपऱ्या पुणे पोलिसांकडून हटवण्यास सुरुवात

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल या संदर्भात दिले होते आदेश

शहरातील कुठल्या ही शाळेच्या १०० मीटर परिसरात पान टपरी असेल तर ती तात्काळ काढून टाकण्यात यावी असे आदेश आयुक्तांनी दिले होते

आयुक्तांच्या आदेशानंतर वानवडी भागातील शाळेच्या जवळ असणाऱ्या पानटपऱ्यांवर पुणे पोलिसांनी केली कारवाई

शाळेच्या आवारात असलेल्या पान टपऱ्या हटवत पान टपरी धारकांवर गुन्हा दाखल

वानवडी परिसरातील गिरमे हायस्कूल या शाळेजवळ 100 यार्ड अंतरामध्ये असलेले दृष्टांत पान शॉप होते, हे पान शॉप अतिक्रमण विभागच्या मदतीने काढून घेण्यात आले

रमाकांत म्हात्रे यांचा प्रदेश काँग्रेसवर विधानसभा निवडणुकीत पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप

नवी मुंबईतील काँग्रेसचे जेष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेय.

विधानसभा निवडणुकी दरम्यान माझ्या मुलाला तिकीट मिळावे यासाठी माझ्याकडे रमेश चेनीथल्ला यांच नाव पुढे करुन टिळक bhavan मधील एका नानाने 4 कोटी रुपायांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप रमाकांत म्हात्रे यांनी केलाय.

Nanded : पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पडली पार.

नांदेड जिल्ह्या नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडली.नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विषयांवर वादळी चर्चा झाली..महावितरण आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेत्ती उपसा विरोधात आमदार आणि खासदारांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.मागच्या वर्षीच्या खर्चाचा आढावा आणि पुढील वर्षाच्या खर्चाचे नियोजन यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

माझ्या स्वागतासाठी जेसीबी लावू नका, पंकाजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक: गाईसह काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज दूध उत्पादक संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून गाईचे पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. गोकुळ दूध संघाने गायीच्या दूध दरात प्रतिलिटर चार रुपये आणि तीन रुपये अशी दोन वेळा कपात केली आहे. ही कपात थांबवावी आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर सरकारने सात रुपये अनुदान जाहीर केले ते कायमस्वरूपी लागू करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान सरकारने अनुदान दिलं नाही तर शेतकरी उग्र आंदोलन करतील असा इशारा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष ज्योतीराम घोडके यांनी दिला आहे.

नागपुरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणारा आर्थिक बजेटचं विश्लेषण

- विकसित भारत 2047 अंतर्गत अमृत काल पर्व सुरू असून लोकांना आर्थिक साक्षर करण्यासाठी नागपुरात तीन दिवसीय कॉनक्लेवच आयोजन करण्यात आले...

- 1 फेब्रुवारीला या काँक्लेवच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः बजेटवर विश्लेषण करणार आहेय...

- यासोबतच गुंतवणूक क्षेत्रातले जानकार असलेले विजय केडिया हे सुद्धा या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असतील...

- मनी बी इन्स्टिट्यूट आणि वेंचर कॅटालिस्ट यांच्या माध्यमातून दरवर्षी आर्थिक साक्षर करण्यासाठी या कार्यक्रमाचा आयोजन केले जाते... यासोबत शेअर मार्केटमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी य कार्यक्रमांचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहेय.

उद्योगांना यापुढे राज्यात उद्योग उभारताना एनए ची आवश्यकता नाही,⁠ महसुल विभागाचे शासनादेश

- १९६६ च्या महसुल कायद्यात शासनाकडुन बदल

- ⁠राज्यात नवीन उद्योग उभारणार्या उद्योजकांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार

- ⁠एनए अर्थात नॅान ॲग्रीकल्चर/ अकृषिक परवानगी साठी उद्योगांचा माठा वेळ जात होता. एनए परवानगीसाठीचा हा वेळ प्रत्यक्ष उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या वेळे एव्हढा होता. असं शासनाचं म्हणणं

- ⁠एनए ची अट रद्द केल्यानं राज्यात उद्योग उभारणी सोपी होणार.

- ⁠एनएसाठी होणारी उद्योगांची अर्थपुर्ण अडवणुक थांबणार

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाजपचे दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड

आज कल्याण एपीएमसीच्या सभापतीपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या ..या निवडणुकीसाठी 17 सदस्य उपस्थित होते . दत्ता गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दत्ता गायकवाड हे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचे कट्टर समर्थक आहेत.

शरद पवारांचे फक्त दहा आमदार, विश्वासच बसत नाही- राज ठाकरे

मागील दोन महिन्यांत बरेच लोक मला भेटायला आले. विधानसभा निकालानंतरच्या गोष्टीचे आकलन सुरू आहे. शांत आहे,याचा अर्थ विचार करतोच असा नाही.

निकालानंतर राज्यात सन्नाटा. लोकांनाही या निकालाचे आश्चर्य वाटलं. मिरवणुका निघाल्या नाहीत. लोकांमध्ये संभ्रम होता, असं कसं झालं.

राजू पाटलांचे १४०० लोकांचं गाव.. पण त्या गावातानू त्यांना एकही मत नाही मिळालं. राजू पाटलांना स्वत:च्या गावातून एकही मत कसं मिळू शकत नाही, अशी शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केली, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Bhiwandi: भिवंडी शहरातील टेमघर पाडा येथे घराला लागली आग

भिवंडीतील आगीचे कारण अस्पष्ट

आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक

यात कोणतीही जीवितहानी झाली नसून

अग्निशामक दलाची एक गाडी दाखल होत

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

नांदेडमध्ये एसटी बस - ट्रॅक्टरची समोरासमोर धडक; २५ प्रवासी जखमी

अपघातात बसमधील 25 प्रवाशी जखमी.

बरबडा- पाटोदा रस्त्यांवर झाला अपघात.

गंभीर नऊ जखमींना उपचारासाठी नांदेडला हलवले.

अँकर:- नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरबडा ते पाटोदा रस्त्यावर एसटी बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली.या अपघातात एसटी बस मधील 25 प्रवाशी जखमी झाले.तर नऊ प्रवाशांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

माढ्याची परळी होऊ देणार नाही- अभिजित पाटील यांचे सूचक विधान

माढ्याची परळी होऊ देणार नाही असं सूचक विधान आमदार अभिजित पाटील यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याने माढ्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

अलिकडेच माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना वाळू माफियांनी दमदाटी करत धक्का बुक्की केली होती. या घटने नंतर आमदार अभिजित पाटील यांनी माढ्याची परळी होऊ देणार नाही असे सूचक वक्तव्य केले आहे. माढ्यात अजूनही एक दोन अक्का चे अक्का आहेत. त्यांना शोधून काढू असा सूचक इशाराही आमदार पाटील यांनी दिला आहे.

पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शेतकऱ्याला लुटले

पुण्यातील भोर - शिरवळ मार्गावरील वडगाव डाळ गावाच्या हद्दीत घडली घटना

याप्रकरणी नामदेव एकनाथ मांढरे या शेतकऱ्याने भोर पोलीस स्टेशनंमध्ये दिली फिर्यादी.. दोघा अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल..

मांढरे हे भोरहून शेती संबंधित काही कामे उरकून शिरवळच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना, मागून दुचाकी वरून आलेल्या दोघा चोरांनी मांढरे यांची गाडी थांबवत पोलीस असल्याची खोटी बतावणी करून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्याजवळील सोन्याचा अवैज केला लंपास..

अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आष्टा येथे भिकुजी महाराज जन्मोत्सव सोहळा..

दीड क्विंटलचा केक कापून जन्मोत्सव साजरा..

राज्यातील विविध भागातून 234 सहभाग..

पंढरपूरच्या पालखीला पहिला बहुमान.

दीड लाख भाविकांची उपस्थिती..

200 क्विंटलचा महाप्रसाद, महाप्रसादासाठी भाविकांची रीध

दरम्यान चार धामातील संतांची उपस्थिती..

पुण्यात जेष्ठ सामजिक कार्यकर्ते बाबा आढाव याच मुक आंदोलन

सरकारच्या असत्य कथन व वर्तनाच्या निषेधार्थ मुक आंदोलन

पुण्यात पुणे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करत आहे मुक आंदोलन

काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम मधील घोटाळे विरोधात बाबा आढावा यांनी आत्मकलेश आंदोलन केलं होत..

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांच्या कारवाई विरोधात नागरिक चांगलेच आक्रमक

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या कारवाई विरोधात नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

पंढरपुरच्या यमाई तलावत उडी मारून तरूणाची आत्महत्या

पंढरपूर शहरातील यमाई तलावात उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे.

ऋतिक शंकर कदम ( वय 23 ) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋतिक हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये हंगामी कर्मचारी होता. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता.30) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आज सकाळी ऋतिकचा मृत्यदेह पाण्यात सापडला.

उबाठा गटाला नांदेडमध्ये धक्का सहसंपर्कप्रमुख डॉ.मनोज भंडारी यांचा भाजपात प्रवेश

नांदेडमध्ये पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसलाय.ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख डॉ.मनोज भंडारी यांनी पक्षाला सोडचिठी देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय.प्रवेश केल्यानंतर ते आज पहील्यादाच नांदेडमध्ये आले त्याचे भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.त्यांची भाजपच्या जैन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी निवड करण्यात आलीय.

महापालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरू

- महापालिकेचे कर भरणा केंद्र आता सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत. महापालिकेच्या घरपट्टीची थकबाकी ७९४ कोटींवर गेल्याने थकबाकीदारांवर कारवाई करण्याबरोबरच अधिकाधिक वसुली होण्यासाठी आता शनिवार, रविवार तसच सुट्टीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतलाय. मागील वर्षांपर्यंतची थकबाकी ५८७कोटी ९४ लाखांवर पोहोचली आहे..तर चालू वर्षाची मागणी २०६ कोटी ४७ लाख इतकी आहे. अशा प्रकारे एकूण मागणीच्या आकडा ७९४ कोटी ४२ लाखांवर पोहोचला आहे... त्यामुळे कर वसुली करण्यासाठी आता महापालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत.

अमरावतीत उबाठाचे प्रमुख प्रशांत ठाकूर यांच्यावर प्राणघातकहल्ला

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात अवैद्य वाळू माफियांकडून शिवसेना उबाठाच्या उपशहर प्रमुख प्रशांत ठाकूर यांच्यावर प्राण घातक हल्ला ..

शहरातील बुटी चौक येथे मध्यरात्री तीनच्या दरम्यान झाला हल्ला..

हल्ल्यात तिघांचा समावेश ..

अवैध वाळू माफियांचा ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केल्याने प्रशांत ठाकूर यांच्यावर झाला हल्ला

प्रशांत ठाकूर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने केला हल्ला

प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यावर तरुणाने दोन वाहने जाळली

पुणे प्रेयसी सोबत झालेल्या ब्रेकअप नंतर पुण्यात प्रियकरांने प्रेयसीची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळली.

पुण्यातील रामटेकडी येथील धक्कादायक प्रकार

अमजद पठाण असे प्रेयसीच्या वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव..

पठाण याचे त्याच्या परिसरात असणाऱ्या एका महिलेसमोर प्रेम संबंध होते.परंतु काही दिवसापासून त्याची प्रेयसी त्याला बोलत नव्हती.यामुळे चिडलेल्या पठाण यांनी घरासमोर असलेल्या दोन गाड्या या पेट्रोल टाकून आज पहाटेच्या सुमारास दिल्या पेटवून.

भुम तालुक्यातील पाथरूड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

धाराशिव च्या भुम तालुक्यातील पाथरूड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेली सहा दिवसापासून आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण करत असुन याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा व जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवावे या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

छत्रपती संभाजी नगरमध्ये अपघात; रस्ता ओलांडत असताना हायवेने महिलेले चिरडले

छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरात असलेल्या मिनी घाटीसमोर रस्ता ओलांडत असताना एक महिलेला भरधाव हायवाने चिरडल्याची घटना घडली आहे.हा अपघात एवढा भीषण होता की हायवाच्या मागील टायरमध्ये महिला पूर्णपणे फसली होती.त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने हायवा उचलून महिलेला बाहेर काढण्यात आले.महिलेला तातडीने मिनी घाटीत नेताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मालनबाई विनायक चौधरी वय वर्ष 52 असे मृत महिलेचे नाव असून चिकलठाणा पोलिसांनी हायवा चालक प्रवीण देवबा पाटील यास ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Live Update : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या सामूहिक आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार करण्यात आले होते. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील दुपारी बारा वाजता मराठा समाज बांधवांशी आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषणाबाबतचा पुढील निर्णय जाहीर करणार आहे. आज दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार की दुसरा कोणता निर्णय जाहीर करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

नागपुरात दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक

- नागपूर शहराच्या यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत एटीएसने विशेष कारवाई करत दोन अवैध बांगलादेशी घुसखोराना ताब्यात घेतलं...

- शहरात आणखी किती घुसखोर आहेत. आणि कुठे कुठे वास्तव्याला आहेत तसेच त्यांनी भारताच्या हद्दीत कसा प्रवेश घेतला ही सर्व माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

- 33 वर्षीय अब्दुल रफिक अब्दुल हमीद आणि 30 वर्षीय सलीम अब्दुल हमीद हे दोघे भाऊ टिपू सुलतान चौक परिसरात किरायाने राहत होते. त्यांच्याकडे कुठलेही नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड नव्हते. त्यांचे आई वडील आणि अन्य नातेवाईक बांगलादेश येथे असल्याने मोबाईल फोन मध्ये बांगलादेश ॲपद्वारे ते इंटरनॅशनल कॉलिंग करत असल्याचे समोर आले आहे.

- याशिवाय त्यांच्याकडे ते बांगलादेशी असल्याचे अन्य कित्येक पुरावे आढळून आले आहेत. न्यायालयाने त्याना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Live Update : पुणे मनपाने जीबीएस आजाराच्या पार्श्वूमीवर २५ हजार घरांचे सर्वेक्षण

पुण्यात सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड गाव,धायरी,किरकटवाडी तसेच आंबेगाव परिसरांत गुलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

त्यातील २० हजार घरांना निर्जंतूक पाण्यासाठी “मेडिक्लोर’ औषध बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

जीबीएसवर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. प्रामुख्याने नांदेड येथील विहिरीतून या गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याने तेथे पाणी निर्जंतुकीकरणासाठी क्लोरिनची मात्रा दुप्पट केली आहे.

या विहिरीवरून २१ सबमर्सिबल पंपाद्वारे पाणी उपसा केला जात असून प्रत्येक पंपातून जाणाऱ्या पाण्याचे नमुने संकलित केले जात आहेत.

नागरिकांना पाणी उकळून व गाळून घेणे, बाहेरील अन्नपदार्थ टाळणे याबाबत आवाहनही करण्यात येत आहे. पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या सुरक्षेसाठी जाळीचे आच्छादनही करण्यात येत आहे.

सागवान तस्कर वन विभागाच्या रडारवर, वनाधिकाऱ्यांनी केली मोठी कार्यवाही

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या सागवान वृक्षाची तोडणी करून चोरट्या मार्गाने वाहतुक सुरू आहे दरम्यान गोपनीय माहितीवरून सागवान तस्कराविरोधात वन विभागाने मोठी कारवाई केली असून कळमनुरी शहराच्या जवळ सागवान तस्करांनी जमा करून ठेवलेला मोठा साठा वन विभागाच्या पथकाने जप्त केला आहे याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभागाचे स्वतंत्र पथक आरोपीचा शोध घेत आहे

नारायणगाव अपघातातल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू....मृतांचा आकडा दहावर..

नारायणगाव येथे झालेल्या भीषण अपघातात मृत पावलेल्या चिमुकलीच्या आईचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भीषण अपघातातील मृतांची संख्या दहा झाली आहे.

एसटी सांगली विभागीय कार्यालयात स्वच्छता मोहीम संपन्न. महापालिकेच्या सहकार्याने दीड टन कचरा संकलित

सांगलीच्या एसटी विभागीय कार्यालय आवारात महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत एसटी विभागीय कार्यालयाची शंभर ते सव्वाशे कर्मचारी सहभागी झाले होते. या स्वच्छतेने स्टँड परिसर स्वछ दिसू लागला. यावेळी एसटी विभाग नियंत्रक सुनील भोकरे आणि एसटी स्वच्छता समिती सदस्य यांच्या उपस्थितीत ही मोहीम करण्यात आली.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या हंगामी कर्मचाऱ्याची पंढरपूर येथील यमाई तलावत उडी...

रात्री अकरा वाजता मित्रांसमोर ऋतिक शंकर कदम याने तलावात मारली उडी .....

रात्री पासून शोध कार्य सुरू...

अद्याप ऋतिकचा शोध लागला नाही....

बेपत्ता अशोक धोडी यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश

पालघर - शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरण . बेपत्ता अशोक धोडी यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश . पाच संशयित फरार आरोपींपैकी 2 आरोपी राजस्थान ला पळून गेल्याची माहिती . शोधासाठी पोलिसांची पथक परराज्यात दाखल . धोडी यांचा घातपात करून संशयित आरोपी राजस्थान येथे पळून गेल्याचा पोलिसांचा अंदाज . तर पोलीस चौकातून पळून गेलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही . परराज्यातील दारू तस्करी करण्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्याने अपहरण करून घातपात केल्याची सूत्रांची माहिती . दारू तस्करितून संशयित आरोपींनी कोट्यावधींची माया जमवल्याची माहिती .

Maharashtra Live Update : सांगलीत जीबीएसचा शिरकाव, ६ रूग्ण

सांगली जिल्ह्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) चे आणखी तीन रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्ण संख्या आता सहावर गेली आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आष्टा (ता.वाळवा), विटा (खानापूर) व नेलकरंजी (आटपाडी) येथील रूग्ण आहेत. या रूग्णांवर सांगली शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सांगली शहरात रूग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवार अखेर ६०० घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत जलतपासणीही केली. सांगली शहरातील चिंतामणीनगर मध्ये एका रूग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यात बुधवार अखेर जीबीएसचे सहा संशयित रूग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिलीय. सांगलीत आढळलेला रूग्ण अजमेर, आग्रा आदी ठिकाणी जाउन आला असल्याने त्या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य विभागाने म्हंटलंय. संशयित रूग्णावर योग्य उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून जाउ नये असे आवाहन करत असताना पाणी उकळून पिण्याचे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हातापायामध्ये गोळे मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली तर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत. हा आजार संसर्ग जन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही. असे ही सांगण्यात आलं आहे.

पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या यंदा जानेवारी महिन्यात अचानक वाढली.

पुण्यात ‘जीबीएस’चे रुग्ण आधीपासून आढळत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्या वर्षी शहर परिसरातील खासगीसह सरकारी रुग्णालयांमध्ये ‘जीबीएस’च्या १८५ रुग्णांची नोंद झाली होती.

पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या यंदा जानेवारी महिन्यात अचानक वाढली.

ही रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होऊ लागले.

याचबरोबर ‘जीबीएस’बाबत अनेक गैरसमज पसरू लागले.

यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांकडून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत आढळलेल्या जीबीएस रुग्णांची आकडेवारी संकलित केली

Jalgaon : ३१ लाडक्या बहिणींनी नाकारले पैसे! पडताळणी होणार असल्याने लाभासाठी नकार

जळगाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पडताळणी होणार आहे. त्याची धास्ती जिल्ह्यातील अंपात्र लाभार्थ्यांनी घेतली असून, आजपर्यंत ३१ लाडक्या बहिणींनी स्वताहून अर्ज करत लाभ नाकारला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे जिल्ह्यात सात लाख ७३ हजार लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी ज्या पात्र नाहीत त्यांनीही अर्ज करून लाभ घेतला आहे. राज्य शासनाने पात्र महिलांना लाभ देण्याचे संकेत दिले आहेत. पण, विधानसभा निवडणुका संपल्यामुळे राज्य शासनाने अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ३१ लाडक्या बहिणींनी लाभ नाकारला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याणच्या अधिकारी आर. आर. तडवी यांनी दिली.

Latue Live Update : पुन्हा एकदा उदगीरमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव

उदगीर मधील रामनगर भागात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय., भोपाल येथे पाठवण्यात आलेल्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतील कोंबड्यांच्या नमुनेंचे अहवाल आता पॉझिटिव्ह आले आहेत... त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे., दरम्यान या परिसरातील एक किलोमीटर परिसरातील कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट देखिल लावले गेली आहेत ...,त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याच आव्हान देखील आता प्रशासनाने केले आहे

nagpur police news : पोलीस कर्मचाऱ्याची विष प्राशन करत आत्महत्या

- नागपुरात कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्ट्रॉंगरूनवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याची विष प्राशन करत आत्महत्या

- रामचंद्र रोहनकर अस पोलीस कर्मचाऱ्याच नाव आहे.

- रामचंद्र यांनी काल कर्तव्यावर असताना विश प्राशन केलं होतं.

- रामचंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला, त्यावेळी पत्नीला विष प्राशन केल्याच सांगितले.

- काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्याने तीन महिन्यासाठी निलंबन केले होते,

- विभागीय चौकशी सुरू असल्याने, बडरतर्फी कारवाईची टांगती तलवार असल्यान तणावात असल्याच बोललं जातं.

NAGPUR : दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

- 14 वर्षांपासून नागपुरात वास्तव्यास असणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक, नागपूर एटीएस आणि यशोधरानगर पोलिसांची कारवाई

- अब्दुल रफिक अब्दुल हमीद खान वय 33 वर्षे आणि 30 वर्षीय मोहम्मद सलीम अब्दुल हमीद अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावं आहेत

- दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असून बनावट आधार, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र तयार करून यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात राहत होते

- दोन्ही आरोपींचे पालक आणि एक बहीण देखील बांगलादेशात राहत असल्याचा चौकशी दरम्यान समोर आलं

- दोन्ही भावांनो विरोधात पोलिसांनी पासपोर्ट कायदा 1950 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Maharashtra Live Update : समृद्धी महामार्गावर मूलभूत सुविधा उपलब्ध का केल्या नाहीत - कोर्ट

- नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर मूलभूत सुविधा उपलब्ध का केल्या नाहीत असा सवाल रस्ते महामंडळाला नागपूर खंडपीठाने विचारला...

- महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापिक संचालक याना प्रश्न विचारत समन्स देऊन गुरुवारी होणाऱ्या सुनावणीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

- समृद्धी महामार्गवर आवश्यक ठिकाणी उपहारगृहप्रसाधनगृहे महान दुरुस्ती केंद्र यासह मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या याचे सर्वेक्षण करत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

- याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर रस्ते महामंडळावर नागपूर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.