Mumbai New EXpress Way Will Connect Navi Mumbai Kalyan Dombivli to Mumbai
Marathi January 31, 2025 02:24 PM


Mumbai New Expressway मुंबई : मुंबईला स्वप्नांची नगरी म्हणून ओळखलं जातं. डोंबिवली, कल्याण, बदलापूर आणि उल्हासनगर या भागातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईत येण्यासाठी येथील नागरिकांना रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीचा पर्याय आहे. मात्र दोन्ही पर्याय सध्य फेल ठरत आहेत. कारण रस्ते वाहतूक करताना वाहतुककोंडी आणि रेल्वे वाहतूक करताना प्रवाशांच्या गर्दीमुळे होणारी धक्काबुक्की सहन करत मुंबई गाठावी लागते. मात्र आता या नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA एका नव्या ‘एक्स्प्रेस वे’ची निर्मिती करत आहे. (Mumbai New EXpress Way Will Connect Navi Mumbai Kalyan Dombivli to Mumbai)

MMRDA निर्मित करत असलेला एक्सप्रेसवे मुंबई, नवी मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय महामार्ग, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरला जोडला जाणार आहे. या एक्सप्रेस वेवर तीन बोगदे आणि पाच अंडरपास असणार आहेत. महामार्गाची लांबी 20 किमी असणार आहे. त्यात चार इंटरचेंज असतील. या एक्सप्रेस वेच्या बांधकामासाठी 200 हेक्टर जमीन उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. यासाठी अंदाजित 10 हजार 833 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

एक्सप्रेसवे बांधण्यासाठी निविदा जारी

डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या उपनगरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. हा नवीन एक्सप्रेसवे येथील लोकांसाठी महत्त्वाचा असेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अलिकडेच मर्यादित प्रवेश द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी निविदा जारी केली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी ही निविदा जारी करण्यात आली आहे.

एक्सप्रेसवेवर एक इंटरचेंज असणार

एमएमआरडीएच्या अहवालानुसार, हा महामार्ग मुंबई आणि दिल्ली दरम्यान बदलापूरपासून सुरू होईल. यामध्ये मुंबई-वडोदरा रोड, कटाई-बदलापूर आणि कल्याण रिंग रोडचा समावेश असेल. या एक्सप्रेसवेचा पहिला इंटरचेंज अंबरनाथमधील पालेगाव येथे असेल. दुसरा इंटरचेंज कल्याण पूर्वेतील हेदुतणे येथे असेल. हा मार्ग कल्याण रिंग रोड आणि कल्याण शिळफाटा रोडला जोडेल.

प्रवासी अंतर कमी होणार

हा एक्सप्रेसवे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मार्गामुळे नवी मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, ठाणे आणि परिसरातील वाहतुकीची समस्याही कमी होईल.

हा एक्सप्रेसवे 8 पदरी असणार

एमएमआरडीएचा नवा एक्स्प्रेस वे 8-लेनचा असणार आहे. या एक्सप्रेसवेवर वाहने ताशी 80 किमी वेगाने धावू शकतील. या एक्सप्रेसवेचा अहवाल 31 जानेवारी रोजी सादर केला जाईल. निविदेसाठी ऑनलाइन अर्ज 17 फेब्रुवारीपर्यंत सादर करता येतील.

एक्सप्रेस वेवर तीन बोगदे

या एक्सप्रेस वेवर तीन बोगदे आणि पाच अंडरपास असतील. महामार्गाची लांबी २० किमी असेल. त्यात चार इंटरचेंज देखील असतील. या एक्सप्रेस वेच्या बांधकामासाठी 200 हेक्टर जमीन उपलब्ध करून द्यावी लागेल. यासाठी अंदाजे खर्च 10 हजार 833 कोटी रुपये असेल.


हेही वाचा – Ashish Shelar : आपण जरा डोकावून पहा काही शिकण्यासारखे आहे का? आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सल्ला



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.