Best weight loss tips to get fit before Valentine’s Day: व्हेलेंटाईन डे हा प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशी प्रत्येकाला सुंदर आणि फिट दिसायचे असते. तुम्हाला वजन कमी कसे करालयचे असा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका. कॉमेडी क्वीन भारती सिंगच्या ७ फिटनेस टिप्स फॉलो करू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही कठोर डाएट किंवा जीमला जावे लागणार नाही.
भारतीने तिचे वजन 91 किलोवरून 76 किलोपर्यंत कमी केले आणि तेही काही छोटे बदल करून. योग्य पद्धतींचा अवलंब केल्यास वजन कमी करणे अवघड काम नाही हे तिने सिद्ध केले. त्यामुळे जर तुम्हालाही व्हॅलेंटाईन डेपूर्वी स्लिम ट्रिम दिसायचे असेल तर भारती सिंगच्या पुढील टिप्स नक्की ट्राय करू शकता.
तणावमुक्त जीवनताणतणाव हे देखील वजन वाढण्याचे प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान, योग करावे. अशा गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. स्वत:ला आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी आपले छंद जोपावे आणि पुरेशी झोप घ्यावी.
अधूनमधून उपवास कराअधूनमधून उपवास करून वजन कमी करू शकता. या उपवासात तुम्ही दिवसातील काही तास अन्न वर्ज्य करा आणि उर्वरित काळात संतुलित आहार घ्या. संध्याकाळी 7 नंतर काहीही खाऊ नका आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 12 नंतरच जेवण करावे. फक्त पाणी, ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी प्यावे. अधूनमधून उपवास केल्याने केवळ वजन कमी होण्यास मदत होत नाही तर पचनसंस्था सुरळितपणे कार्य करते. जर तुम्ही त्याचा योग्य अवलंब केला तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
ध्येयावर लक्ष ठेवावजन कमी करण्याचे तुमचे ध्येय स्पष्ट आणि मजबूत असले पाहिजे. भारतीने तिच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले आणि तिच्या फिटनेस प्रवासात शिस्त राखली. महिन्याभरात 2-3 किलो वजन कमी करणे यासारखी छोटी-छोटी उद्दिष्टे देखील ठेवावीत आणि ती साध्य करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान ध्येय पूर्ण करता तेव्हा स्वतःला प्रोत्साहित करा.
पुरेसे पाणी प्यावेपुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. शरीरात पाण्याची पातळी योग्य असेल तर पचन सुरळित राहते. शरीर हायड्रेट असणे गरजेचे असते. यामुळे वजन नियत्रणात राहू शकते. दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या आणि स्वतःला हायड्रेट ठेवा.
घरचे पदार्थबाहेरचे जंक फूड खाणे टाळा आणि घरी बनवलेले साधे आणि पौष्टिक अन्न खाण्याची सवय लावा. आहारात डाळी, भाज्या, रोटी आणि कोशिंबीर यांसारखे संतुलित अन्न आपल्या आहाराचा भाग बनवले. घरी बनवलेले पदार्थ हे आरोग्यदायी तर असतेच पण ते अनावश्यक कॅलरीजपासून वाचवते. चविष्ट पण हेल्दी खायचे असेल तर घरच्या घरी प्रयोग करा आणि नवीन रेसिपी ट्राय करा.
हलका व्यायामजीमला जाण्याएवजी तुम्ही लहान घरगुती कामे आणि योगासने करू शकता. जर तुम्हालाही व्यायामासाठी जास्त वेळ देता येत नसेल, तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत थोडे बदल करा. लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा, जवळच्या बाजारात पायी जा आणि थोडा वेळ डान्स करा. या लहान बदलांचा तुमच्या शरीरावर मोठा परिणाम होऊ शकतो.
गोड कमी खावेमिठाई आणि साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहा. साखरेच्या अतिसेवनाने वजन तर वाढतेच, पण ते आरोग्यासाठीही हानिकारक आहे. जर तुम्हाला मिठाई खाण्याची आवड असेल तर गूळ, मध किंवा फळे निवडा. हे तुमची गोड लालसा देखील पूर्ण करेल आणि तुमचे आरोग्य सुधारेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.