Maghi Ganesh Jayanti Special Recipe: माघी गणेश जयंतीला बाप्पाला अर्पण करा खोबरं अन् गुळाचे स्वादिष्ट मोदक, नोट करा रेसिपी
esakal February 01, 2025 11:45 AM

How to make coconut and jaggery Modak Recipe : हिंदू धर्मात माघी गणेश जयंतीला खुप महत्व आहे. यंदा १ फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जात आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात. आजच्या दिवशी बाप्पाला आवडणार पदार्थ म्हणजे मोदक अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात. माघी गणेश जयंतीनिमित्त घरीच बाप्पासाठी खोबर आणि गुळापासून स्वादिष्ट मोदक बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य गव्हाचे पीठ

खोबर

गुळ

तूप

काजु

बदाम

मनुका

विलायची पावडर

मोदक बनवण्याची कृती

खोबर आणि गुळापासून मेदक बनवण्यासाठी सर्वात आधी गव्हाच्या पीठात थोडे तांदळाचे पीठ मिसळा. नंतर त्यात पाणी टाकून हळूहळू पीठ चांगले मळून घ्या. नंतर झाकून ठेवा. नंतर गुळ आणि खोबर किसून घ्या आणि एकत्र करा. नंतर त्यात बारिक केलेले सुकामेवा टाका. आता गव्हाच्या पीठाची छोटी गोल पोळी करा आणि त्यात खोबर-गुळाचे सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या. तयार झालेले मोदक एका प्लेटमध्ये ठेवा. नंतर पॅन गरम करा त्यात तूप टाका. नंतर सर्व मोदक चांगले तपकिर होइपर्यंत तळून घ्यावे. तयार मोदक बाप्पाला अर्पण करू शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.