Pakistan 15-man squad for : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचा १५ सदस्यीय संघ शुक्रवारी जाहीर केला. मोहम्मद रिझवानच्या कर्णधारपदाखाली पाकिस्तानचा संघ खेळणार आहे. १९ फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. पाकिस्तान यजमान असले तरी भारतीय संघाच्या नकारामुळे हायब्रिड मॉडेलनुसार ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. पण, पाकिस्तानातील स्टेडियम्सचे कामं अजूनही अपूर्ण असल्याने या स्पर्धेवरच संकट आहे. ही स्पर्धा दुबईत पूर्णपणे हलवली जाऊ शकते अशी चर्चा आहे.
ने २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती आणि जेतेपदाचा बचाव करण्यासाठी ते प्रयत्नशील असणार आहे. बाबर आजमने कर्णधारपद सोडल्यानंतर मोहम्मद रिझवानकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली ५० षटकांची ही पहिलीच आयसीसी स्पर्धा आहे. उदयोन्मुख खेळाडू सईम आयुबचे या संघात नसणे हा सर्वांना आश्चर्याचा धक्का आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती.
२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा अनुभवी फखर जमान या संघात कायम आहे. ओव्हल, लंडन येथे त्याने पहिले वन डे शतक (106 चेंडूत 114) केले होते आणि पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव केला होता. फहीम अश्रफ, खुशदिल शाह आणि सौद शकील यांनाही संघात परत बोलावले गेले आहे. पाकिस्तानला अ गटात भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे.
पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हॅरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
२० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
२१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
२२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
२४ फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
१ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
२ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
४ मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई*
५ मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर**
९ मार्च - फायनल - गद्दाफी स्टेडियम, लाहोर**
* उपांत्यपूर्व १ मध्ये भारत पात्र ठरला तर तो सामना दुबईत होईल.
**पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी २ सामना लाहोर येथे होईल
*** जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाईल