धुळे शहरातील औद्योगिक वसाहत MIDC मधील संजय सोयाबीन तेल कंपनीत गॅसचा स्फोट झालाय. एक कर्मचारी मृत्युमुखी झाल्याची प्राथमिक माहिती तर आणखी एक जण गंभीर जखमी झालाय. कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू असताना स्फोट झाला. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे पथक तत्काळ दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेत बनावट लाभार्थ्यांचा धुमाकूळ, 18 हजार अर्ज बोगसराज्य सरकारने सुरू केलेल्या 1 रूपयात पिक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे.सातारा जिल्ह्यातील 18 हजार 755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पिक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता.या विमा कंपन्यांनीही नुकसानीची खातरजमा न करता प्रक्रिया राबवल्याने हा सर्व प्रकार कृषी विभागाच्या पडताळणीत समोर आल्यामुळे विमा कंपनीला जाणारे 5.5 कोटी वाचले आहेत.या पुढील काळात पिक विमा बाबत बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाकृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले आहे.
पुणे, नागपूरनंतर अमरावतीत जीबीएसचा शिरकाव...अमरावतीत जीबीएसचा शिरकाव.
जीबीएसचे दोन संशयित रुग्ण आढळले.
दर्यापूर व पथ्रोट येथील दोघांवर अमरावतीत उपचार.
दोन्ही रुग्ण हे 16 वर्ष वयोगटाच्या आतील.
सातारा जिल्ह्यात पिक विमा योजनेसाठी 18 हजार अर्ज बोगसराज्य सरकारने सुरू केलेल्या 1 रूपयात पिक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे.
सातारा जिल्ह्यातील 18 हजार 755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पिक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता.
या विमा कंपन्यांनीही नुकसानीची खातरजमा न करता प्रक्रिया राबवल्याने हा सर्व प्रकार कृषी विभागाच्या पडताळणीत समोर आल्यामुळे विमा कंपनीला जाणारे 5.5 कोटी वाचले आहेत.
या पुढील काळात पिक विमा बाबत बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाकृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले आहे.
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला कबड्डी खेळण्याचा आनंदक्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भरणे यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांवर अटकेची टांगती तलवारकेडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांवर अटकेची टांगती तलवार
लाच प्रकरणी सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि उपायुक्त अवधूत तावडे यांना कधीही होऊ शकते अटक
दीड लाख घेताना अटक झालेला लिपिक प्रशांत धिवर याचा मोठा खुलासा
फक्त माझ्यासाठी नाही या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी मागितले होते पैसे
प्रशांत धिवर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी
मध्यान्ह भोजनाचे तांदूळ, डाळ जप्त; संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची कारवाईछत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरामध्ये मध्यान्ह भोजनाचे तांदूळ, डाळ जप्त
जिल्हाधिकारी यांनी केली थेट कारवाई, टाकला छापा
गजानन सेल्स ऍग्रो गोडाऊनवर जिल्हाधिकारीनी टाकला छापा
खाजगी गोडाऊनमध्ये मध्यान्ह भोजन असलेल्या सरकारी धान्याचा साठा हा ठेवण्यात आला होता
मुंबईत बीकेसी परिसरात भीषण आगमुंबईमधील कुर्ला पश्चिममध्ये असलेल्या सीएसटी रोडवरील भीषण आग.
भंगाराच्या गोदामाला लागली आग.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.
Palghar : वाडा टायर कंपनीच्या बाॅयलर स्फोटात उपचार घेत असलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यूपालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील एम. डी. पायरोलीसेस या कंपनीत बुधवारी बॉयलरचा स्फोट होऊन कामगार व त्यांच्या कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले होते. स्फोट व आगीच्या घटनांत निष्पाप जिवांचे बळी जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
Jalna : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच जालन्याच्या भाजपच्या कार्यालयामध्ये दाखलजालन्याचे पालकमंत्रिपद स्विकारल्यानंतर पंकजा मुंडे आज पहिल्यांदाच भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल.
आमदार संतोष दानवे, माजी आमदार विलास खरात, भास्कर दानवे अशा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं स्वागत.
अमरावतीच्या 450 भाविकांची फसवणूक, कुंभमेळाव्याला नेतो म्हणून उकळले पैसेकुंभमेळाव्याला नेतो म्हणून सहा हजार रुपये पैसे उकळले. मात्र त्यांची काहीच व्यवस्था झाली नाही, भाविकांना जेवणाची राहण्याची व्यवस्था नाही.
आमदार रवी राणा यांचा कार्यकर्ता सुरज मिश्रा यांनी आमची फसवणूक केल्याचा भाविकांचा आरोप.
सुरज मिश्रा यांच्यावर कारवाई व्हावी व त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी अमरावतीचे भाविक आक्रमक.
माझ्या विरोधात भाजपाच्या लोकांनी पैसे वाटले - आमदार बालाजी कल्याणकरआमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजपाच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांनावर गंभीर आरोप केले आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपा मध्ये नवीन आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. माझ्या विरोधात भाजपाच्या लोकांनी पैसे वाटले, असे कल्याणकर म्हणाले.
मला 50 हजारांची लीड मिळणे अपेक्षित असताना केवळ साडेतीन हजारांची लीड मिळाली.
माझा निसटता विजय झाल्याची खदखद शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली.
PM Narendra Modi : बजेटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अर्थमंत्र्याचे अभिनंदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले. 'बजेटमध्ये विकासाबाबत ठोस पावले उचलली गेली. सर्वसामान्यांची बचत वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात विचार केला गेला. जनतेच्या हिताचं बजेट सादर केले', असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले.
लिथियम आयन बॅटरी स्वस्त केल्याच्या निर्णयावरुन गडकरींनी केली अर्थसंकल्पाची स्तुतीदेशाच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. यावर नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "भारत 22 लाख कोटींचा इंधन आयात करतो. लिथियम आयन बॅटरी स्वस्त करण्यात आल्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल स्वस्त होतील. जे 150 डॉलर प्रति किलोवॅट प्रती तास होते, ते भविष्यातील 100 डॉलर प्रति किलोवट प्रति तासच्या खाली जाईल आणि त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्स स्वस्त होतील.. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल."
Baramati : अवैधरित्या वाळू उपसा कारणाऱ्या ३ बोटींवर इंदापुरात कारवाईइंदापुरात उजनी जलाशयात बेकायदा बेसुमार अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या ३ बोटी जिलेटीनच्या साह्याने उध्वस्त करीत पाण्यामध्ये बुडवून नष्ट करण्यात आल्यात.
इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व पोलीस प्रशासनाने सयुक्तरित्या ही कारवाई केलीय. थेट जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवत,३ बोटी उडवून देत वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे.
Ratnagiri: रत्नागिरी शहरातील शिवखोल घाटीतील वडाच्या झाडाला आगरत्नागिरीतील शिवखोल घाटीत असणाऱ्या जुन्या वडाच्या झाडाला अचानक आग
अचानक झाडाने पेट घेतल्याने नागकरिकांसह वाहन चालकांची उडाली तारांबळ
आग लागल्याची बातमी समजतात एमआयडीसीचा अग्निशामक बंब घटनास्थळावर दाखल
Midc च्या बंबा मार्फत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरु
केंद्र सरकार बजेट सादर, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...- महिला तरुण आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर देणारा हा मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे
- शेतकऱ्यांसाठी सात कोटी किसन कार्ड दिले जाणार असून त्याची मर्यादा सुद्धा सरकारने वाढवलेली आहे
- सर्वात अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारला पायाभूत सुविधांसाठी तब्बल दीड लाख कोटी हे दिले जाणार आहे
- शेतकरी महिला आणि तरुण सर्वांचा विचार करून केंद्र सरकारने सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचे मी अभिनंदन करतो
केडीएमसीच्या बाजार परवाना विभागातील लाचखोर क्लर्क लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातकल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाजार परवाना विभागातील क्लर्कला दीड लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केडीएमसी मुख्यालयात सापळा रचत अटक केली....
प्रशांत धिवर असे या लाचखोर क्लार्कचे नाव आहे...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे केडीएमसी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे....
आता पर्यंत केडीएमसी मधील 38 अधिकारी , कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते....
प्रशांत धिवर याला अटक झाल्यानंतर हा आकडा 39 वर गेला आहे....
त्यामुळे केडीएमसीला लागलेले लाचखोरीचे ग्रहण कधी सुटणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे....
माघी गणेश जयंती उत्साहात होतेय साजरी, सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दीआज माघी गणेश जयंती निमित्ताने भक्तांनी राज्यभरातील विविध मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
रात्रीपासून विविध ठिकाणच्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती.
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
सकाळी 5 वाजता झालेल्या आरतीमध्ये 100 ते 200 भाविक सामील झाले होते.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीची तिथी ही गणेश जयंती म्हणून ओळखली जाते.
सिद्धटेक हे पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र असून त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात.
पंकजा मुंडेंना भेटू देत नसल्याने शेतकरी संघटनेचा पोलिसांसमोर गोंधळआप्पासाहेब कदम असा या कार्यकर्त्याचं नाव.
मला फाशी द्या असं पोलीस अधिकाऱ्यासमोरच म्हणत गोंधळ.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांची बैठक सुरू असताना दालन शेजारीच हा संपूर्ण प्रकार घडला.
अडीच वर्षापासून आपण जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत असल्यासही या कार्यकर्त्याचा म्हणणं आहे.
या कार्यकर्त्याला पोलीस अधिकाऱ्याची जिल्हाधिकार्यालयातच धक्काबुक्की केल्याचेही दिसून आले आहे...
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 फेब्रुवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरविधानसभा निवडणुकीत महायुतीचे दणदणीत विजय मिळवल्या नंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात आभार दौरा सुरू केला आहे.
या आभार दौऱ्याच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे हे 6 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
6 फेब्रुवारी रोजी शिंदे यांची नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर जाहीर सभा होणार असून या सभेची आज पासून तयारी करण्यात येत आहे.
या मैदानावर भव्य सभा मंडप उभारला जाणार आहे.
या सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन विधानपरिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर,आमदार आनंद बोनढारकर यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Baramati: बारामती नगर परिषदेकडे अत्याधुनिक फायर फायटर वाहन दाखलबारामती नगर परिषदेकडे आता अत्याधुनिक असं नवीन अग्निशमन फायर फायटर वाहन दाखल झालेय.
या वाहनाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामतीमध्ये पार पडला आहे.
या आत्याधुनिक वाहनामुळे बारामतीकरांच्या सुरक्षित अधिक भर पडलीय.
MPSC Audio Clip: एमपीएससी ऑडिओ क्लिपबाबत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाईचाकण मधून दोघं जणांना गुन्हे शाखेने केली अटक
एमपीएससीच्या (MPSC) मुलांना आदल्या रात्री प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते.
यानंतर एक संभाषण रेकॉर्ड झालेला एक कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता.
या फोन कॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती. नोकर भरतीत मोठा घोटाळा होणार असल्याच्या चर्चा रंगली होत्या.
मात्र आता याबाबत पुणे पोलिसांनी कारवाई करत बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय
अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.
Jalna News: जालना जिल्हा नियोजन समितीची आज बैठकपालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच बैठक
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ठेकेदारीची कीड, ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका - निलेश राणेसिंधुदुर्ग जिल्ह्याला ठेकेदारीची कीड लागली असून नुसती बजबजपुरी करून ठेवली आहे.
अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका अशा पद्धतीची मागणी आमदार निलेश राणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली.
वराड-सोनवडेपार पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या जाहीर व्यासपीठावरून निलेश राणे यांनी पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधीकारी याच्याकडे ही मागणी केली आहे.
मंत्री नितेश राणे यांनी निलेश राणेंची मागणी मान्य करत अशा ठेकेदारांना तत्काळ ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याच आश्वासन दिले असून सरकारचा पैसा स्वतःच्या बापाचा असल्यासारखा वाटतो अशा ठेकेदारांची मस्ती उतरवण्याचा इशारा सुद्धा नितेश राणे यांनी दिला आहे.
Washim: वाशिमच्या शेलुबाजारमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यातवाशिम जिल्ह्यात वाहतूक नियमाचे तीन तेरा.....
चक्क एका ऑटो रिक्षामधून १० ते १५ विद्यार्थी कोंबून नेत असल्याचं व्हिडीओ समोर आला आहे....
त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून पोलीस प्रशासनाने वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.....
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरतीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी प्राप्त नवीन वाहनांचे अनावरण
बारामती उप विभागातील उघडकीस आलेल्या मालमत्तेचे गुन्ह्यातील मालाचे मूळ मालकास वितरण
पश्चिम विदर्भातीलही कापूस उत्पादक शेतकरी संकटात नवीन वर्षातही कापसाला दरवाढ नाहीसीसीआय आणि खाजगी बाजाररातही कापसाला सारखाच भाव...
यावर्षी 7 हजार 521 रुपये कापसाला हमीभाव मिळालेला नाही.
देशांतर्गत सरकी आणि रुईचे भाव
स्थिरावल्याने कापूस बाजारपेठेत मोठी मंदी.
कापूस उत्पादक शेतकरी संकटात शेतकऱ्यांना कापसाच्या भावाची प्रतीक्षा..
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मार्गावर भाजप जात आहे - छगन भुजबळआम्ही भाजपासोबत आहोतच ना, मग जाण्याचा प्रश्न येतो कुठे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मार्गावर भाजप जात आहे. मंत्रालयात जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या प्रतिमा लावणे, स्मारकाचे काम पुण्यात, नायगाव येथे सुरू आहे. ओबीसीच्या संरक्षणासाठी ते आमच्यासोबत आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.
Pune News: भारत सरकारच्या 'वीरगाथा ४.०' स्पर्धेत साधना विद्यालयाचा यश कित्तूर देशात पहिलाभारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केलेल्या "वीरगाथा ४.०' प्रकल्पांतर्गत आयोजित स्पर्धेत येथील साधना विद्यालयाच्या नववीत शिकणाऱ्या यश लक्ष्मण कित्तूर या विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक पटकावला.
तया स्पर्धेसाठी "राणी लक्ष्मीबाई माझ्या स्वप्नामध्ये आल्या; मी आपल्या देशाची सेवा करावी, अशी त्यांची इच्छा होती.' या सूचक विषयावर निबंध लेखन केले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व दिनी राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याला दहा हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Dagdusheth Halwai: दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात साजरा होतोय गणेशजन्म सोहळाप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थी, गणेशजन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्त मंदिराला आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे...
मंदिरात आज पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला तर पहाटे ४ ते ६ यावेळेत स्वराभिषेक कार्यक्रम झाला सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे हा कार्यक्रम सादर केला..
त्यानंतर सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक होणार आहे......
सकाळी ८ ते ११.३० ते दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत गणेशयाग होणार असून दुपारी १२ वाजता गणेशजन्माचा सोहळा होईल....
सायंकाळी ६ वाजता नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघेल. रात्री ८.३० वाजता श्रींची महाआरती होईल आणि रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर करण्यात येणार आहे...
Pune News: पुणे जिल्ह्यात 303 शाळा मॉडेल करणार, सुविधांसाठी 417 कोटीचा आराखडा सादरशैक्षणिक दर्जा सुधारणार
खासगी शाळांच्या धरतीवर जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारावा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पहिली ते आठवीच्या जिल्ह्यातील तीनशे तीन शाळा मॉडेल स्कूल करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.........
या विषयाच्या 417 कोटी रुपयांचा आराखड्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले............
मॉडेल्स स्कूलमध्ये शाळांमध्ये भौतिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील.............
पुणे जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या 3 हजार 546 शाळा आहेत या शाळात 2 लाख 38 हजार 395 विद्यार्थी शिकतात..............
Sangli News: सांगली मार्केट यार्डात नवीन बेदाण्यास 225 रुपये भाव, तर मार्केटमध्ये 30 टन बेदाण्याची आवकचांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्यांचा प्रारंभ झाला आहे.
मुहूर्ताच्या सौद्यावेळी तब्बल 30 टन बेदाण्याचे आवक मार्केटमध्ये झाली आहे.
हिरव्या बेदाण्यास 225 रुपये दर तर पिवळ्या बाजाण्यास 191 रुपये प्रत्येक किलो असा भाव मिळाला आहे.
बेदाण्यास चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बेदाणा विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती यांनी केले आहे.
नवीन बेदाणा सौदयात 7 दुकानात 30 टन बेदाण्याची आवक झाली आहे.
तर यादव ट्रेंडर्स दुकानात मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील शेतकऱ्यांच्या हिरव्या बेदाण्यास 225 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.
वसंतदादा मार्केटमध्ये चालू वर्षाच्या हंगामातील बेदाण्याचा प्रारंभ करण्यात आला यावेळी बेदाणाला हा दर मिळाला आहे.
Jalna News: जालना जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेतजालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं होतं...
त्या नुकसानी कोटी शासनाकडून 412 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला तरीही हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही.
तहसील स्तरावरून याद्या अपलोड करण्यास दिरंगाई होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल अडीच लाख शेतकरी हे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
आतापर्यंत केवळ 41 हजार 368 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या असून उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होण्यासाठी दिरंगाई होत असल्याने हे शेतकरी या अनुदानाची मोठ्या आशेने प्रतीक्षा करत आहे.
त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार असा सवाल
Pankaja Munde : पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्हा दौऱ्यावरराज्याच्या पर्यावरण वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्हा दौरावर आहेत.
सकाळी 11 वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.
बैठकीनंतर पंकजा मुंडे ह्या जालना जिल्हा भाजप कार्यालयाला देखील भेट देणार आहे.
Pune News: पुणे नगर महामार्गावर शिक्रापुर पोलीसांची गांजा तस्करांवर मोठी कारवाईशिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ सह पोलिसांनी 53 किलो गांजा जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 19 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.