Union Budget 2025 Healthcare Updates: आज आर्थिक वर्ष २०२५ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक काही मोठ्या घोषणा त्यांनी केल्या.
त्यात कॅन्सरला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत ज्या हॉस्पिटल्समध्ये कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात तिथे कॅन्सर डे-केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे.
कॅन्सर डे केअर सेंटरडेकेअर सेंटर मध्ये कॅन्सर रुग्णांसाठी सगळ्या सोयी-सुविधा असणार आहेत. या गंभीर आणि खर्चिक आजारामुळे कॅन्सरग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक, मानसिक त्रास होतो. त्यामुळे त्यांना हा त्रास होऊ नये म्हणून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना उपचारासोबत मानसिक आधार आणि व्यावहारिक मदतही दिली जाणार आहे. डे केअर सेंटर्समध्ये रुग्णांना ज्या दिवशी उपचार होईल त्याच दिवशी घरी पाठवले जाईल. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत व्हायला मदत होणार आहे.
कॅन्सर डे केअर सेंटरचे कार्यकॅन्सर डे केअर सेंटर मध्ये प्रायव्हेट लाउंज किंवा कॉमन एरियामध्ये दिल्या जाऊ शकणाऱ्या केमोथेरपी इन्फुजन सुविधा पुरवतात. तसेच डे केअर सेंटर्स कॅन्सर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मार्गदर्शन करतात आणि मदत पुरवतात.