Income Tax Slabs: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने नव्या करप्रणालीत 12 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर नसल्याची घोषणा केली आहे. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर लावल्या जाणाऱ्या करावर सर्वसामान्यांना कर सवलत मिळणार आहे. जर तुमचा पगार 12 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर कोणत्या स्लॅबवर किती कर आकारला जाईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कराचे गणित समजून घ्याजर तुमचा पगार 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. जर तुमचे उत्पन्न 12 लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. तुम्ही विचार करत असाल की 12 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर कर शून्य आहे, मग हा कर स्लॅब का देण्यात आला आहे?
उदाहरणार्थ- जर तुमचे 20 लाख असेल तर तुम्हाला
- 0-4 लाख रुपयांपर्यंत - 0 कर लागले
- 4-8 लाख रुपयांपर्यंत 5 टक्के कर लागेल म्हणजे तो 20,000 रुपये होईल
- 8-12 लाख रुपयांपर्यंत 10 टक्के लागेल म्हणजे तो 40,000 रुपये होईल
- 12-16 लाख रुपयांपर्यंत 15 टक्के कर लागेल म्हणजे तो 60,000 रुपये होईल
- 16 - 20 लाख रुपयांपर्यंत 20 टक्के कर लागेल म्हणजे तो 80,000 रुपये होईल
या सगळ्या करांची बेरीज केली तर 20 लाख उत्पन्नावर तुम्हाला 2 लाख रुपये टॅक्स द्यावा लागेल.
मध्यमवर्गीयांना दिलासाया नव्या रचनेचा मुख्य उद्देश दिलासा देणे हा आहे. गेल्या काही वर्षांत आयकर स्लॅबमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाहीत, त्यामुळे करदात्यांची निराशा झाली आहे. आता, सरकारने ही समस्या सोडवली आहे, ज्यामुळे नोकरदार आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना अधिक आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.