नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प काल लोकसभेत सादर केला. निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) मांडला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला दिलासा देणारी मोठी घोषणा केली. प्राप्तिकराच्या (Income Tax) आकारणीमध्ये नव्या कररचनेत (New Tax Regime) त्यांनी फेरबदल जाहीर केले. नव्या कररचनेत स्लॅबमध्ये बदल याशिवाय करमुक्त उत्पन्नाची मर्यादा देखील वाढवत असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. रिबेटसह करमुक्त उत्पन्न 12 लाख का केलं या संदर्भातील सविस्तर माहिती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दिली त्या दूरदर्शनशी बोलत होत्या.
एका विशिष्ट पातळीपर्यंत उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यानंतर करासंदर्भात चर्चा करणं आवश्यक आहे. 7 लाखांवरुन 12 लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्न का करण्यात आलं? यापूर्वी ते 2.2 लाख रुपये होतं ते 2014 मध्ये 2.5 लाख रुपये केलं गेलं होतं. 2019 मध्ये 5 लाख रुपये उत्पन्न करमुक्त करण्यात आलं, त्यानंतर ते पुढे 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आलं. आता करमुक्त उत्पन्न 12 लाख करण्यात आलं. सरकारची भावना ही आहे की एखादा व्यक्ती दरमहा 1 लाख रुपये कमवत असेल तर त्याला कर द्यावा लागू नये, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.
आम्ही यामध्ये दोन मार्ग वापरले आहेत. पहिला म्हणजे स्लॅबचे दर घटवले आहेत. नवे स्लॅब अधिक योग्य आहेत. दुसरा मार्ग आहे त्यात स्लॅबचा विस्तार केलेला आहे. याचा फायदा सर्व उत्पन्न गटातील सर्व करदात्यांना होणार आहे, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.स्लॅब रेटमध्ये कपात केल्याचा फायदा काही लोकांना मिळे, मात्र, अधिक रिबेट देण्यात आली आहे. स्लॅब रेटमध्ये कपात करण्यात आली ती सर्वांना लागू होईल. तर, अधिक रिबेट देण्यात आली आहे ती काही अधिक लोकांना लागू होईल. करदात्यांकडील जो पैसा वाचणार आहे तो परत अर्थव्यवस्थेत यावा, लोकांकडून खरेदी व्हावी, बचत व्हावी आणि गुंतवणूक या मार्गानं पैसा अर्थव्यवस्थेत परत यावा, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.
निर्मला सीतारामन पुढं म्हणाल्या, काँग्रेसच्या सरकारच्या काळात 2014 मध्ये जो व्यक्ती 8 लाख रुपये कमवत असेल त्याच्या हातात आता 1 लाख रुपये अधिकचे असतील. त्याला 2014 मध्ये 1 लाख रुपये कर द्यावा लागत असेल आता शून्य कर द्यावा लागेल. जो 2014 मध्ये 12 लाख रुपये कमवत असेल त्याला त्यावेळी 2 लाख रुपये कर द्यावा लागायचा आता त्याला कर द्यावा लागणार नाही. याशिवाय जो 24 लाख रुपये कमावतो त्याला 2014 च्या कररचनेनुसार 5.6 लाख रुपये कर द्यावा लागायचा आता त्याला 3 लाख रुपये कर द्यावा लागेल.
निर्मला सीतारामन यांनी रिबेटसह करमुक्त उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत केल्यानं आता 1 कोटी लोकांना कर द्यावा लागणार नाही, असं म्हटलं.
कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स
0 ते 4 – शून्य
4 ते 8 – 5 टक्के
8 ते 12 लाख – 10 टक्के
12 ते 16 लाख – 15 टक्के
16 ते 20 लाख – 20 टक्के
20 ते 24 लाख – 25 टक्के
24 लाखापुढे – 30 टक्के
इतर बातम्या :
केंद्र सरकारने आणलेली पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
अधिक पाहा..