Ashnir Vs Salman: अश्नीरनं सलमानला पुन्हा डिवचलं! जाहीर कार्यक्रमात केली सडकून टीका; म्हटलं, "नाव माहिती नाही तर..."
esakal February 02, 2025 04:45 AM

Ashnir Grover Vs Salman Khan : 'भारत पे'चा माजी सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यानं पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर आगपाखड केली आहे. त्यांनी सलमानवर जोरदार टीका करत त्याला डिवचलं आहे. एनआयटी कुरुक्षेत्र इथं विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी सलमानवर निशाणा साधला.

अश्नीर म्हणाला, "फालतूचा पंगा घेऊन त्यांन आपल्याविरोधात आव्हान निर्माण केलं आहे. जेव्हा मला बिग बॉस १८ मध्ये बोलावलं गेलं पण तेव्हा मी शांततेत निघून गेलो होतो. पण त्यानंतर ड्रामा तयार करण्यासाठी त्यानं सांगितलं की अरे मी तर तुम्हाला भेटलोच नव्हतो, मला तर तुमचं नावंही माहिती नाही. "पण मी म्हणतो जर माझं नावच तुला माहिती नाही तर मग मला बिग बॉसमध्ये बोलावलं का होतं?"

अश्नीरनं पुढे असंही म्हटलं की, "आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे, जर सलमान खान माझ्या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर होता तर असं कधीच होऊ शकत नाही की मला भेटल्याशिवाय तो ब्रँड अँबेसिडर झाला. मी पण हरामखोर माणूस होतो, मलाच कंपनीत सर्वकाही बघावं लागत होतं"

दरम्यान, अश्नीर ग्रोव्हर यांनी २०२३ मध्ये एका पॉडकास्टमध्ये बोलताना सलमान खानशी संबंधित एका घटनेवर भाष्य केलं होतं. "सलमानसोबत एक फोटो काढण्याची संधी आपल्याला मिळाली नाही" असं त्यांनी म्हटलं होतं. पण यानंतर जेव्हा अश्नीर बिग बॉसमध्ये गेस्ट म्हणून गेला तेव्हा त्यानं आपल्या विधानाबाबत सलमानची माफी मागितली.

पण तेव्हा सलमान खान त्याच्यावर भर कार्यक्रमात चिडला होता आणि म्हटलं होता की, "मला तर तुझं नावही माहिती नव्हतं. पण जेव्हा मी तुझा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा तुझा चेहरा माझ्यासमोर आला. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, आपण या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की, जर एखादी व्यक्ती आपल्या समोर असू किंवा नसू त्याच्याविरोधात टिप्पणी करता कामा नये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.