सुप्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) कायमच आपल्या आवाजाने प्रेक्षकांना घायाळ करतात. आजवर त्यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. नेहमी आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असलेले उदित नारायण आता एका वेगळ्याचे गोष्टीमुळे चर्चेत आले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उदित नारायण यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ते एका महिला चाहतीला लिप किस करताना दिसत आहे.
गायक यांनी लाइव्ह शोमध्ये सेल्फी काढताना महिला चाहतीला किस केले आहे. यामुळे उदित नारायण यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता यावर उदित नारायण यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. एका मिडिया मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "चाहते खूप वेडे असतात. मी सभ्य माणूस आहे. काही लोक अशा गोष्टी करून आपले व्यक्त करतात. मग आता ही गोष्ट व्हायरल करून काय मिळणार आहे? गर्दी खूप असते. चाहत्यांना नेहमी कलाकारांना भेटण्याची इच्छा असते आणि जेव्हा ती संधी मिळते तेव्हा काही हात मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर काही हाताला किस करतात. हे चाहत्यांचे प्रेम आहे. याकडे लक्ष देऊ नये."
पुढे उदित नारायण म्हणाले की," मी गातो तेव्हा चाहत्यांना खूप आनंद होतो. माझ्या कुटुंबाची प्रतिमा चांगली असल्यामुळे अनेक वेळा काहींना वाटते की वाद व्हावा. शांत स्वभावाचा आहे आणि तो वादात सापडत नाही. माझ्या कार्यक्रमात सर्वांना आनंदी ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. "
शेवटी उदित नारायण म्हणाले की, ते अचानक घडले. मला बॉलिवूडमध्ये ४६ वर्षे झाली आहेत. माझी प्रतिमा अशी नाही. माझ्या चाहत्यांचे प्रेम पाहून मी हात जोडतो आणि नतमस्तक होतो. " असे बोलून उदित नारायण यांनी आपले मत मांडले आहे. उदित नारायण यांच्या स्पष्टीकरणावरही अनेक चांगली-वाईट मते नेटकऱ्यांकडून येत आहेत.