Digestion Tips : पोटातील अन्न पचायला किती वेळ लागतो?
Marathi February 02, 2025 08:24 PM

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो. आपण खाल्लेलं अन्न पोटाला पचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुम्ही एखादा पदार्थ आवडीने खाता पण तो पोटात गेल्यानंतर तुमच्या आतड्यांना पचवता येतोच, असे नाही. अशाने अनेकांना अॅसिडिटीचा त्रास होतो. पण, काही पदार्थ खाल्ल्यानंतर ते सहज पचतात आणि काही त्रासही जाणवत नाही.

आपल्या अन्नाला शरीराचे पोषण, ऊर्जा, मनाला शक्ती आणि जिभेला चव देण्याआधी बराच प्रवास करावा लागतो. प्रथम दातांनी ते चावतात, नंतर पोटात जाते, नंतर लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जाते आणि शेवटी किडनीद्वारे शरीराबाहेर जाते. आहारतज्ज्ञांचे मते रोजच्या आहारातील एखादा पदार्थ पचण्यासाठी किती वेळ लागतो? आणि पोटातील आतड्यांना आरामदायी वाटावे म्हणून कोणत्या पदार्थांचे मर्यादित सेवन केले पाहिजे जाणून घेऊया.

  • साधारणपणे अन्न पचायला 24 ते 72 तास लागतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न खाल्ले आणि किती प्रमाणात खाल्ले यावर ते अवलंबून असते.
  • चपाती शरीराला दीड ते दोन तासांत पचते. लोकांच्या पचनसंस्थेवर हे अवलंबून असते.जर तुम्ही वारंवार चपाती खात असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. पचनसंस्था निरोगी असेल तर चपाती लवकर पचते.
  • अनेक अहवालांमध्ये असे दिसले आहे की, मांस-मासे पचवण्यासाठी शरीराला जास्त वेळ लागतो. यामध्ये जास्त प्रोटीन आणि असल्याने ते पचवायला शरीराला 2 दिवसही लागू शकतात.
  • टोमॅटो, मुळा, शिमला मिरची, काकडी अशा भाज्यांमध्ये ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हे पचायला 30/40 मिनिटे लागतात. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली सारख्या भाज्यांना पचायला 40 मिनिटे लागतात. गाजर आणि बीट सारख्या भाज्या पचायला सुमारे 50 मिनिटे लागतात.
  • गहू, ब्राऊन राईस, ओट्स आणि कॉर्न यांसारखे धान्य पचायला आणि पोटातून बाहेर पडण्यासाठी 90 मिनिटे लागू शकतात. त्याचप्रमाणे कडधान्ये, वाटाणे, सोयाबीन इत्यादींना पचायला 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
  • ज्यूस, पाया सूप किंवा रस्सा यांसारखे पदार्थ लगेच पचतात; पण फायबर, प्रोटीन किंवा फॅट्सयुक्त पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.