India vs England 5th T20I Live : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाने 3-1 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे, त्यामुळे हा सामना फक्त औपचारिकता आहे. भारतीय खेळाडू हा सामना जिंकून मालिकेचा शेवट करण्याचा प्रयत्न करतील.
मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियाने जिंकले होते. यानंतर, इंग्लंडने तिसरा टी-20 जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय संघाने चौथा टी-20 जिंकून मालिका जिंकली.