Crime: तीन ते चार जणांनी घरातून नेले, नंतर गळा चिरला; भाजप नेत्याच्या मृत्यूने देश हादरला, धक्कादायक कारण समोर!
esakal February 03, 2025 12:45 AM

झारखंडमधील चतरा येथे भाजप नेत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भाजप नेते एका खटल्यातील साक्षीदार होते आणि त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही हत्या अतिरेक्यांनीच केली असावी, अशी भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आधी तीन ते चार जणांनी त्याला घराबाहेर नेले आणि गळा चिरून त्याची हत्या केल्याचे लोकांनी सांगितले. हत्येनंतर या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी प्रशासन काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे. चतरा येथील तांडवा येथील लेंबुआ गावात राहणारे भाजप नेते विष्णू साओ यांची हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी आधी भाजप नेत्याला घरातून नेले आणि नंतर गळा चिरून त्यांची हत्या केली.

मृत हा एनआयएच्या एका खटल्यातही साक्षीदार होता, यातूनच हा खून झाल्याचा संशय आहे. या हत्येचा आरोप टीपीसी दहशतवाद्यांवर केला जात आहे. सकाळी आठच्या सुमारास काही लोक विष्णू साव यांच्या घरी आले आणि त्यांना सोबत घेऊन गेले. घरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ही हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

एनआयएच्या एका खटल्यात साक्षीदार असल्याने विष्णू साव यांची हत्या करण्यात आली आहे. टीपीसीच्या अतिरेक्यांनी आधी भाजप नेत्याचे अपहरण केले आणि नंतर गळा चिरून ही घटना घडवून आणली, अशी भीती लोकांनी व्यक्त केली आहे. लोकांनी सांगितले की, सकाळी चार जण विष्णू साव यांच्या घरी आले होते आणि त्यांना उचलून सोबत घेऊन गेले. काही वेळाने घरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळून आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.