आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना असे वाटते की, करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, परंतु वेळ मात्र कमी आहे. अनेकदा आपल्याला समजत नाही की, आपण नेमके कुठे जात आहोत, आपले ध्येय काय आहे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी प्राधान्याने करायला हव्यात. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी योग्य पद्धतीने ध्येयनिश्चिती आणि प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे.
ध्येय नसल्याने आपली वाटचाल दिशाहीन होते. त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो आणि तणाव, चिंता वाढू लागते. काही महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. -
ध्येयविहीनता
चिकाटीचा अभाव
प्रगतीचा स्पष्ट मार्ग नसणे
प्राधान्यक्रम न ठरविणे
नियोजनाचा अभाव
आळशीपणा आणि काम पुढे ढकलण्याची सवय
वाढलेला मानसिक तणाव
ही आव्हाने ओळखून त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित असावे आणि त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करावेत.
ध्येय ठरविणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हा प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. उदा - सचिन तेंडुलकरने बालपणापासून क्रिकेटपटू बनण्याचे ध्येय निश्चित केले आणि सातत्याने सराव करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम प्रस्थापित केले.
ध्येयांची विभागणी
ध्येय निश्चित करताना दोन प्रकारात विभागता येतात ः
वैयक्तिक ध्येय
मानसिक शांती, शारीरिक आरोग्य, कौटुंबिक संबंध सुधारणा.
उदा - दररोज ३० मिनिटे व्यायाम करणे.
व्यावसायिक ध्येय
करिअर प्रगती, कौशल्य वृद्धी, आर्थिक स्थैर्य.
उदा - एक वर्षात पदोन्नती मिळवण्यासाठी अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारणे.
ध्येय निश्चिती आणि प्राधान्यक्रम हे यशस्वी जीवनाचे मूलमंत्र आहेत. योग्य नियोजन, सकारात्मक मानसिकता आणि सातत्याने प्रगती करण्याचा दृष्टिकोन ठेवल्यास आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतो. तुम्हाला शारीरिक तंदुरुस्ती मिळवायची असेल, तर दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे यास प्राधान्य द्यावे. ध्येय निश्चित करून, प्राधान्यक्रम ठरवून, सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश मिळते. त्यामुळे, स्वप्न मोठी ठेवा, निर्धार ठाम ठेवा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे चला!