सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा, 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे?
Marathi March 12, 2025 06:25 PM

सोन्याची किंमत: सोन्याच्या किंमतीत सातत्यानं चढ उतार होत आहे. गेल्या काही दिवसापासून दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच 11 मार्च 2025 रोजी MCX वर सोने मजबूत झाले आणि 86,152 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. परंतु, आज 12 मार्च 2025 रोजी भारतातील सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 112 रुपयांची घसरण झाली आहे.MCX वर सोने 86,040 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे.

कोणत्या शहरात सोन्याला किती दर?

आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नई सारख्या इतर मेट्रो शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, 86,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 86,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा दर 79,044 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 86,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. वाराणसीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,063 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,250 रुपये आहे. लखनौमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,063 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,026 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाटणामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 78,998 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पुण्यात 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 79,044 रुपये आणि 86,230 रुपये आहे.

चांदीची स्थिती काय?

चांदीच्या वायदा किमतींची सुरुवातही तेजीची होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा बेंचमार्क करार आज वाढीसह उघडला. आज 12 मार्च 2025 रोजी चांदीचा दर 98,380 रुपये प्रति किलो होता. दिल्लीत चांदीची किंमत 982 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत 986.6 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकात्याबद्दल बोलायचे झाले तर ते 982.4 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पाटण्यात ते 983.3 रुपये प्रति 10 ग्रॅम, लखनऊमध्ये 984 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि जयपूरमध्ये 983.6 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.