Latest Maharashtra News Live Updates : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? रोहित पवार यांचा सवाल
esakal March 12, 2025 10:45 PM
Rohit Pawar Live : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? रोहित पवार यांचा सवाल

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत प्रश्न विचारला, यावर आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील असे सांगितले.

Ajit Pawar Live : शिवरायांनी कधीही जातीभेद केला नाही- अजित पवार यांच्या नितेश राणेंना कानपिचक्या

छत्रपती शिवाजी महारांच्या सैन्यात मुस्लिम मावळे देखील होते. महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.

Delhi Live : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली लालकृष्ण आडवाणी यांची भेट

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. रेखा गुप्ता यांची ही भेट अडवाणी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. रेखा गुप्ता त्यांच्या व्यस्ततेतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेत आहेत.

Live: भारतीय नौदलात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सुरू!

- भारतीय नौदलात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सुरू!

- भारतीय नौदल आणि मैत्रीपूर्ण देशांचे ५० अधिकारी पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सुरू झालेल्या NWMTC-63 नौदल शस्त्र आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रशिक्षणात सहभागी!

Live: श्रीलंकेत अविस्सवेल्ला येथे शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचे उद्घाटन, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

श्रीलंकेतल्या अविस्सवेल्ला इथं शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचं उद्घाटन झालं. मोठ्या संख्येनं भाविक यावेळी उपस्थित

Live: पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक क्षण: प्रयागराज महाकुंभातील गंगाजल मॉरिशसच्या गंगा तालावात अर्पण!

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयागराज महाकुंभातील पवित्र गंगाजल मॉरिशसच्या गंगा तालाव (Grand Bassin) मध्ये अर्पण केले!

- भारत-मॉरिशसच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नात्याचा पवित्र क्षण.

Pune live : दत्ता गाडे याची येरवडा कारागृहात रवानगी

पुणे सत्र न्यायालयाने दत्ता गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Nandurbar Live: गावातील विकासकामांवरून दोन गट थेट पोलीस ठाण्यात एकमेकांसमोर

नंदुरबारमधील गुजर भवाली गावातल्या विकास कामावरुन आज दोन गट थेट पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांसमोर आले.

या गावात सुरु असलेल्या विविध कामांमध्ये भ्रष्ट्राचाराचा आरोप एका गटाकडून होत होता

Kolhapur Live: प्रशांत कोरटकर यांना काहीसा दिलासा, १७ मार्च पासून दररोज सुनावणी होणार

- इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण

- प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातील सुनावणी

- कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश क्रमांक- २ डी.व्ही. कश्यप यांच्या समोर सुनावणी झाली

- प्रशांत कोरटकर याला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्यात आवश्यकता नसल्याचे कोर्टाच निरीक्षण

Jalgaon Live : जळगावात राखेने भरलेले वाहन RTO च्या ताब्यातून पळवले

जळगावात RTO च्या ताब्यात असलेले राखेने भरलेले वाहन अज्ञातांनी पळवले. यावर अधिक तपास सुरु आहे.

Pune Live : नितेश राणे यांच्या विरोधात मनसे आक्रमक

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा विजय राज ठाकरेंच्या सभेमुळेच झाला असल्याचे करून दिली आठवण

काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्यांनी राज ठाकरे यांना हिंदुत्व शिकवू नये

मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांची नितेश राणे यांच्यावर टीका

राज ठाकरे आपले मत परखडपणे मांडतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे

ज्या ज्या वेळेस हिंदुत्वावर काही गोष्टी आल्या त्याचा प्रखर विरोधाने मुकाबला हाच राज ठाकरे आणि मनसेने केल्या आहे

ज्यांचा भाजपमधील प्रवास हा वाया काँग्रेसमार्फत झाला त्यांनी राज ठाकरे यांना हिंदुत्व शिकवण्याचा भानगडीत पडू नये. - योगेश खैरे, प्रवक्ते, मनसे

Live : "माझं ऐकलं असतं तर राजू शेट्टी आज खासदार असते" -जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला. "त्यांना अनेकदा मविआकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. माझं ऐकलं असतं तर ते आज खासदार असते." असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी Live : पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात कोयता गँगची दहशत..

कोयता घेऊन चोरी करण्याचा प्रयत्न

हातात दगड घेऊन कोयते घेऊन चोरी करण्याचा प्रयत्न

बिबेवाडी परिसरातील दहशत व चोरी करण्यासाठी कोयता चा वापर

सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

सीसीटीव्ही साम टीव्ही च्या हाती

चोरी करण्यासाठी चार तरुण सर्वे नंबर 64 इंदिरानगर गणपती कारखाना या ठिकाणी घेत आहेत. सुरुवातीला या चोरांनी दोन चाकी गाडीचा वापर केला. नंतर हे सर्व चोर प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहणी करू लागले.

चार चोरा पैकी एक चोराच्या हातात कोयता, तर एकाच्या हातात दगड घेऊन चोरी करण्याचा प्रयत्न.

Live : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड येथील अतिक्रमण हटवले

एस टी स्टँड आणि परिसरातील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण, अतिक्रमण विभागाच्या पथकाने हटवले

पौड ते ताम्हिणी या मुख्य रस्त्यापासून आठ मीटर अंतरावरील असणारी अनधिकृत दुकाने, पत्र्याचे शेड जेसीबीच्या सह्याने पाडण्यात आले

पीएमआरडीए, एमएसआरडीसी आणि पी डब्लू डी यांनी एकत्रित अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवत केली संयुक्त कारवाई

अतिक्रमणे काढल्यानं पौड परिसराने घेतला मोकळा श्वास

पौड येथील काढण्यात आलेल्या अतिक्रमण जागेत कोणीही पुन्हा, दुकाने उभी करू नये..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणारं.. पौड पोलिसांचा इशारा..

Beed Crime: बीड प्रकरणात आरोपींच्या वकिलांकडून सरकारी पक्षाकडे तीन मागण्या

संतोष देशमुख खून प्रकरणात बुधवारी पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांनी डिजिटल पुराव्यांसंबंधीच्या तीन मागण्या सरकारी पक्षाकडे केल्या आहेत.

Nashik Live: कृष्णा आंधळेचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर

आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा संशय आहे. त्याचा एक कथित सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून पोलिस अधिकचा तपास करीत आहेत.

beed live: सतीश भोसले उर्फ खोक्या याचा जामीन अर्ज मागे

सतीश भोसले उर्फ खोक्या याचा जामीन अर्ज वकिलाने मागे घेतला. खोक्याला पोलिसांनी अटक केल्यामुळे अर्ज मागे घेतला. ज्यावेळी बीड पोलीस ,त्याला कोर्टामध्ये सादर करतील, त्यावेळेस पुन्हा नव्याने अर्ज केला जाणार असल्याची माहिची खोक्याचे वकील शशिकांत सावंत यांनी दिली.

Live Updates : मल्हार सर्टीफिकेट हे नाव बदलण्यात यावं... श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर यांची मागणी

राज्याचे मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांच्या संदर्भात निर्णय घेत आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.यावर आत्ता श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांना पत्र लिहित मल्हार सर्टीफिकेट हे नाव बदलण्यात यावं अशी मागणी करण्यात आली.

Live : राज्यात उष्णतेची लाट कायम

राज्यात सलग चौथ्या दिवशी उष्णतेच्या लाटेने कहर केला असून,काल मुंबईसह संपूर्ण राज्याचे सरासरी कमाल तापमान 38 ते 39.5 अंशांवर गेल्याने अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवत होता. यंदाच्या हंगामात मुंबईचे तापमान दुसर्यांदा 38, तर येथील सांताक्रूझचे 39.2 अंशांवर गेल्याने मुंबईकर उन्हात होरपळून गेले होते. काल विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून,अकोला शहराचा पारा मंगळवारी 39.5, तर सांताक्रूझ, शिरूर अन् कोरेगाव पार्कचे तापमान 39.2 अंशांवर गेले होते.

Beed Live : सतीश उर्फ खोक्या भोसलेला पर्यागराज मदन बीड पोलिसांनी केले अटक

बीडच्या शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेने ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण केली होती यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता.

सतीश भोसले गेल्या सहा दिवसापासून फरार होता त्याच्या शोधासाठी दोन पथक तयार करण्यात आले होते आणि त्याचा शोध घेत होते त्याला आज सकाळी प्रयागराज पोलिसांनी अटक केली आहे.

Rajguru Nagar Live : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तीन दुचाकींसह पदचाऱ्यांना चिरडलं, राजगुरुनगर भिमाशंकर मार्गावरील घटना

भरधाव वेगाने आलेल्या कारने तीन दुचाकींसह पदचाऱ्यांना चिरडलं..

चालक मद्यपान करुन कार चालवत असल्याचा स्थानिकांचा आरोप

पदचारी नागरिकांना धडक दिल्यानंतर तीन दुचाकींना कारची धडक

पाच जण गंभीर जखमी जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

कार अपघातातील चालक दारुच्या नशेतील व्यक्ती डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती.

Vidarbha Live : टिपेश्वर अभयारण्यात पुन्हा एकदा वाघिणीला फास

मांगी बीटमधील सितार या वाघिणीच्या पायाला दोरीचा फास लागलाय. याआधीही दोन वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकला होता. त्यांना रेस्क्यु करून फास काढला होता. गेल्या महिन्याभरात ही तिसरी घटना घडलीय.

संतोष देशमुख हत्या प्रकरण, सुनावणीला उज्ज्वल निकम अनुपस्थित

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी होत असून या सुनावणीला वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे सासवड रोडवर ट्रक बंद पडल्यानं चार किलोमीटर वाहनांच्या रांगा

पुणे सासवड रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने पुणे- सासवड रस्त्यावर चार किलोमीटरच्या लागल्या रांगा..

सासवड रस्त्यावरील एसपी इन्फोटेक कंपनीच्या समोर धान्याचा ट्रक आडवा होत पडला बंद..

बंद ट्रकमुळे सासवडला जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक कोंडी..

चार किलोमीटर लागल्या रांगा... गेल्या दोन तासापासून भर रस्त्यात ट्रक बंद पडल्याने चाकरमाण्याचे मोठे हाल.

स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची आज पोलीस कोठडी संपणार आहे.

पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आज दत्ता गाडेला शिवाजीनगर न्यायालयात घेऊन येणार आहे.

दत्ता गाडेची आज येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता.

Yashwantrao Chavan Jayanti LIVE : स्व. यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादांनी केले समाधी स्थळी अभिवादन

सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रिती संगमावरील समाधी स्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदी उपस्थित होते.

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा आजपासून न्यायालयीन खटला होणार सुरू

अख्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा आज (ता.12) पासून न्यायालयीन खटला सुरू होत आहे. आज या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार आहे. तर, या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला असून त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. तर आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Bank Employees LIVE : कोल्हापुरात महाराष्ट्र बॅंक कर्मचाऱ्यांचे आज धरणे आंदोलन

कोल्हापूरः ‘लिपिक आणि कर्मचाऱ्यांची भरती करावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी (ता. १२) महाराष्ट्र बॅंकेच्या कावळा नाका येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता सुरू होणारे आंदोलन दिवसभर चालणार आहे,’ अशी माहिती युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील महिन्यापासून आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी माहिती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर युनिटचे सरचिटणीस उमेश खोत यांनी दिली. यावेळी जीवन करवीरकर, धीरज कुराडे, पूजा जाधव, सूरज फाळके, चेतन लाड, सूरज डांगे आदी उपस्थित होते.

Gram Panchayat Election LIVE : कोल्हापुरातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ, 26 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील एक हजार ६७३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मतदार यादी बनविण्याचे काम सुरू असून, १९ मार्चला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, २६ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील एक हजार ६७३ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. तसेच विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य, सरपंच पदासाठी पोटनिवडणूकही होणार आहे. प्राथमिक टप्प्यावर मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्याचा अध्यादेश शासनाने सोमवारी काढला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत विभागातर्फे कामकाज सुरू झाले आहे. प्रारूप मतदार यादी १९ मार्चला प्रसिद्ध होणार आहे. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १९ ते २४ मार्च हा कालावधी आहे.

Bangalore Rain LIVE : पहिल्या पावसामुळे बंगळूरच्या तापमानात घट

बंगळूर : कडक उन्हाने त्रस्त झालेल्या सिलिकॉन सिटी बंगळूरमध्ये अखेर मंगळवारी पाऊस झाला. संध्याकाळी मार्च महिन्यातील पहिला पाऊस पडला. ज्यामुळे शहरातील तापमानात लक्षणीय घट झाली. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंगळूरच्या अनेक भागात पाऊस झाला. शांतीनगर, कॉर्पोरेशन, रिचमंड सर्कल, के. आर. मार्केट आणि मॅजेस्टिक यांचा समावेश आहे. पावसाळी ढग ईशान्य बंगळूरपासून दक्षिणेकडे सरकत आहेत. परिणामी, हालसुरू, इंदिरानगर, बनशंकरी आणि जयनगरमध्येही पाऊस पडत असल्याचे वृत्त आहे.

Nitesh Rane LIVE : हलाल खाणे हिंदू धर्मात लिहिलेले नाही, तर इस्लाम धर्मात..; मल्हार प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर काय म्हणाले राणे?

मुंबई : मल्हार प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "हिंदुत्व विचारसरणीचे पालन करणारे कामगार आता एकत्र आले आहेत आणि त्यांच्या हक्कांसाठी, हिंदू समाजासाठी मटणाचा एक चांगला पर्याय घेऊन आले आहेत. वर्षानुवर्षे फक्त हलाल मटणच खावे, अशी सक्ती केली जात आहे. एकतर हलाल खा, नाहीतर तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आम्ही त्यासाठी एक चांगला पर्याय आणला आहे. हलाल खाणे हे हिंदू धर्मात लिहिलेले नाही, तर इस्लाम धर्मात लिहिलेले आहे. म्हणून, जर कोणी असा चांगला पर्याय आणत असेल तर मी त्यांना पाठिंबा देत आहे."

Ukraine Russia War : युक्रेनने युद्धबंदी प्रस्तावाला दिली मान्यता, अमेरिका पुन्हा सुरक्षा मदत सुरू करणार

युक्रेनने काल (मंगळवार) अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या तात्काळ 30 दिवसांच्या युद्धबंदीला मान्यता देण्याची घोषणा केलीये. याशिवाय, रशियासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने चर्चा सुरू करण्यावरही सहमती दर्शवलीये. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये नऊ तासांहून अधिक काळ झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Shivaji University Exam LIVE : शिवाजी विद्यापीठात पदवी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

कोल्हापूर : मार्च - एप्रिल या उन्हाळी सत्रात होणाऱ्या पदवी परीक्षेचा अर्ज भरण्यास शिवाजी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. या अंतर्गत विलंब शुल्कासह अर्ज करण्यास १७ मार्चपर्यंत मुदत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये परीक्षा अर्ज विनाविलंब शुल्कासह भरण्याची मुदत १३ मार्चपर्यंत आहे. विलंब शुल्कासहित भरण्याची मुदत १४ आणि १५ मार्चदरम्यान आणि अतिविलंब शुल्कासमवेत अर्ज भरण्यासाठी मुदत १६ आणि १७ मार्चपर्यंत आहे. विद्यार्थी हितास्तव या परीक्षांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

Pakistan Train Hijack : बलुच बंडखोरांकडून पाक रेल्वेचे अपहरण, वीस सैनिकांना मारले; 182 ओलिस

कराची : स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या (बीएलए) बंडखोरांनी आज बोलान प्रांतामध्ये पाकिस्तानच्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करत तिचे अपहरण केले. बंडखोरांनी या गाडीतील तब्बल १८२ प्रवाशांना ओलिस ठेवले असून, पाकच्या २० सैनिकांची हत्या केली आहे.

Reserve Bank of India LIVE : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच शंभर-दोनशेच्या नव्या नोटा जारी करणार

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. या नोटांची रचना महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील १०० आणि २०० रुपयांच्या नोटांसारखीच आहे, असे रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने पूर्वी जारी केलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या सर्व नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संजय मल्होत्रा यांनी डिसेंबर २०२४ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला.

Shaktipeeth Highway LIVE : शक्तिपीठ महामार्गाविरोधात इंडिया आघाडीची आज मुंबईत धडक; विधिमंडळावर काढणार मोर्चा

Latest Marathi Live Updates 12 March 2025 : शक्तिपीठ मार्गाविरोधात इंडिया आघाडीतर्फे आज मुंबईतील आझाद मैदानावरून विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. प्रशांत कोरटकर याने नागपूर सायबर पोलिसांकडून जुना राजवाडा पोलिसांना पाठविलेल्या मोबाईलमधील ‘डेटा’ डिलिट केला असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी न्यायालयात केला. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २७ मार्चला निवडणूक आहे. त्यात एक रिक्त जागा ही आमदार गोपीचंद पडळकर यांची आहे. त्या जागेवर भाजप निष्ठावंताला संधी देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.