शिर्डीतील एका तारांकीत हॉटेलमध्ये हैद्राबाद येथील एका भाविकानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना शिर्डीतील मारी गोल्ड हॉटेलमध्ये घडली आहे. मरम रेड्डी अमरनाथ रेड्डी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी रूम बुक केली. नंतर शालच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एका तारांकीत हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळला होता. ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. हैद्राबाद येथील मरम रेड्डी अमरनाथ रेड्डी या साईभक्ताने शिर्डीतील मारी गोल्ड हॉटेलमध्ये एका दिवसासाठी रूम बुक केली होती. त्यानंतर त्यानं आणखी एका दिवसासाठी रूमची मुदत वाढवून घेतली.
आणखी एक दिवस मुदत वाढवून घेतल्यानंतर त्यानं दुसर्या दिवशी डू नॉट डिस्टर्बचा लाईट चालू करून ठेवला. नंतर रूममध्ये सीलिंग फॅनला शाल बांधून आत्महत्या केली. रूमचा दरवाजा उघडत नसल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने लगेच धाव घेतली. नंतर डूप्लीकेट चावीने रूमचा दरवाजा उघडला.
तेव्हा मरम रेड्डी अमरनाथ रेड्डी या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं निदर्शनास आलं. त्या व्यक्तीला गळफास घेतलेलं पाहताच हॉटेल मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हैदराबाद येथील साई भक्तांनी आत्महत्या कुठल्या कारणामुळे केली? एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशा प्रशासनाच्या सूचना असताना हॉटेल व्यवस्थापनाने रूम दिलीच कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात उडाली आहे.