IND vs ENG 5th T20I: 13 Six, 135 runs! अभिषेक शर्माची रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी; रोहित-विराटचा विक्रम मोडला, केले ८ मोठे पराक्रम
esakal February 03, 2025 03:45 AM

Abhishek Sharma highest individual score by an Indian in T20I history: आमीर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक, श्रीमंत उद्योगपती अंबानी हे सेलिब्रेटी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असूनही अभिषेक शर्मा खऱ्या अर्थाने आज स्टार ठरला. अभिषेकने इंग्लंडच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करताना भारताला ९ बाद २४७ धावांपर्यंत पोहोचवले. एका डावात सर्वाधिक षटकार, भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या असे अनेक आज अभिषेकने मोडले.

अभिषेकने ५४ चेंडूंत ७ चौकार व १३ षटकारांसह १३४ धावांची खेळी केली. त्याला तिलक वर्मा ( २४), शिवम दुबे ( ३०) आणि अक्षर पटेल ( १५) यांची साथ मिळाली आणि भारताने २४७ धावांपर्यंत मजल मारली. ट्वेंटी-२०त वानखेडे स्टेडियमवरील ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली. यापूर्वी २०१९ मध्ये मध्य प्रदेशने मेघालयविरुद्ध ४ बाद २४४ धावा केल्या होत्या. २०२४ मधअये उत्तर प्रदेशने ४ बाद २४२ धावा ( वि. अरुणाचल प्रदेश) केल्या होत्या.

भारताची ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या
  • ६ बाद २९८ धावा वि. बांगलादेश, हैदराबाद, २०२४

  • १ बाद २८३ धावा वि. द. आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२४

  • ५ बाद २६० धावा वि. श्रीलंका, इंदूर, २०१७

  • ९ बाद २४७ धावा वि. इंग्लंड, मुंबई, २०२५

भारताकडून ट्वेंटी-२०त जलद ५०० धावा
  • १३ डाव - लोकेश राहुल

  • १६ डाव- विराट कोहली, अभिषेक शर्मा, इशान किशन

  • १७ डाव- ऋतुराज गायकवाड, गौतम गंभीर, युवराज सिंग

२५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ट्वेंटी-२०त सर्वाधिक शतकांच्या विक्रमात अभिषेक शर्माने ( २) फिन अॅलन व तिलक वर्मा यांच्याशी बरोबरी केली. ट्वेंटी-२०त Fastest centuries (full-member vs full-member) अभिषेक तिसरा फलंदाज ठरला. त्याने ३७ चेंडूंत आज शतक पूर्ण केले. डेव्हिड मिलर ( वि. बांगलादेश, २०१७) व रोहित शर्मा ( वि. श्रीलंका, २०१७) यांनी ३५ चेंडूंत शतक झळकावले होते. भारताकडून ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही अभिषेकने आज नावावर केला आणि शुभमन गिलचा ( १२६) विक्रम मोडला.

इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२०त वेगवान अर्धशतकाच्या विक्रमात अभिषेकने ( १७ चेंडू) संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावताना क्विंटन डी कॉकशी बरोबरी केली, युवराज सिंगने २००७ मध्ये १२ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. भारताने आज ट्वेटी-२०तील पॉवर प्लेमधील त्यांचा सर्वोत्तम स्कोअर नोंदवला. आज भारताने पहिल्या ६ षटकांत १ बाद ९५ धावा केल्या.

इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मध्ये ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे
  • २४८/६ - ऑस्ट्रेलिया, साउथहॅम्प्टन, २०१३

  • २४७/९ - भारत, मुंबई, २०२५

  • २४१/६ - दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २००९

  • २३२/६ - पाकिस्तान, नॉटिंगहॅम, २०२१

  • २२४/२ - भारत, अहमदाबाद, २०२१

भारताकडून ट्वेंटी-२० मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार
  • १३- अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, मुंबई, २०२५

  • १० - रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७

  • १० - संजू सॅमसन विरुद्ध बॅन, हैदराबाद, २०२४

  • १० - तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२४

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.