नंदुरबार : चेन्नईहून जोधपुरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला (Nandurbar Crime) झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याने प्रवासी जखमी झाले आहे. भुसावळवरून चढलेल्या एका प्रवाशाची दोन राजस्थानी प्रवाशांचा बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता.
दरम्यान या वादानंतर नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरल्या त्या प्रवाशाने आपल्या काही सहकारी मित्रांना बोलवत या दोघांवर चाकूने हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. यातील दोन्ही जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले असून ताप्ती गंगा एक्सप्रेस जोधपुरकडे रवाना झाली आहे. मात्र या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीस करत असल्याचे बोलले जात आहे.
फास्टट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनावट बनवलेले घड्याळ विक्रेत्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. यात तब्बल 1 लाख 75 हजार रुपयांचे जवळपास 200 घड्याळं जप्त करण्यात आले आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेतील दुकानावर गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. भरत देवजीबाई प्रजापती असे अटक केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-5 यांना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती शहरातील शुक्रवार पेठेत फास्टट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनावट बनवलेले घड्याळ विकत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या दुकानावर छापा टाकला. या विक्रेत्याने त्याच्या दुकानात फास्टट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनवलेले बनावटी मनगटी घड्याळे आढळून आले. या विक्रेत्याकडून एकूण 1 लाख 75 हजार 175 घड्याळं जप्त केली आहेत. त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नीलगायची शिकार करून मटन खाणाऱ्या 12 जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रात वन विभागाने ही कारवाई केली आहे. या घटनेतील आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 15 दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या घटनेने परीसारत एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..