..तर मला आता काळजी घ्यावी लागेल, मंत्री नितेश राणेंच्या सल्ल्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
Marathi February 03, 2025 03:24 AM

छत्रपती संभाजीनगर : कधी संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केले. आता याच मुद्यावरून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मते जाणून घ्यावी, असा सल्ला दिला होता. दरम्यान संजय शिरसाट आमचे मित्र आहे त्यांचा  संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा. असल्याचे ही ते  यावेळी म्हणाले होते. अशातच आता नितेश राणेंच्या या सल्ल्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे.

नितेश राणेंच्या (Nitesh Rane) एवढ्या मला शुभेच्छा मिळाल्या त्याची मला काळजी घ्यावी लागेल, त्यांनी पहिल्यांदाच सूचना केली आहे म्हणून त्यावर मी भाष्य करणार नाही. मी इशारा देत नाही आणि नितेश राणे इशारा देणाऱ्यातले नाही. अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे.

कदाचित त्यांना ती लंडनला पाठवायचे असेल

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक होत आहे तो मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आमच्यासारखे लोक उभे राहिले आहेत. परंतु त्याची इंग्लिश मध्ये माहिती तयार करून कदाचित त्यांना ती लंडनला पाठवायचे असेल, त्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याची टीका  संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच अशोक चव्हाण आणि हेमंत पाटील यांची काय कुरबुर झाली आहे त्याची स्वतः मुख्यमंत्री दखल घेतील आणि समजून सांगतील, असेही ते म्हणाले.

गुलाबराव पाटलांनी जे वक्तव्य केलं तशी वस्तुस्थिती झालेली आहे. प्रत्येक जण आपला धर्म घेऊन चालत असेल, काही लोक धर्म हाच आपला देश आहे, असे मानणारे वेगळी संस्था निर्माण होत आहे. त्यावेळी आपण ही काळजी घेणे गरजेचे आहे.

हे मोठे रॅकेट असून राजकीय पक्षांचे लोक असल्याचा संशय- संजय शिरसाट

वाळूज दाळ मिल कारवाईमध्ये जवळपास सहा ट्रक मिळालेले आहेत. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ते अन्नधान्य मिळालेलं आहे.  त्यात बहुतेक तांदूळ हा पॉलिश करून दुसऱ्या राज्यामध्ये विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये 20 लोकांना अटक केली आहे. चौकशी अजून सुरू आहे, महिला बालकल्याण कार्यालय देखील आता तक्रार दाखल करण्याचे निर्देश मी दिले आहे. गरोदर महिलांना दिलेले अन्नाचे पॉकेट सुद्धा त्यामध्ये आहे. हे मोठे रॅकेट आहे, यामध्ये काही राजकीय पक्षांचे लोक आहेत का असा संशय व्यक्त होतोय.  त्यामुळे खोलात जाऊन चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने कारवाई सुरू असल्याचे ही संजय शिरसाट म्हणाले.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.