गरोदरपणामध्ये योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे आहे. आहाराचा थेट परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर होत असतो. गरोदरपणात महिलांनी फळे खावी त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्वे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. पण काही महिला गरोदरपणात रिकाम्या पोटी फळे खातात. महिलांनी आपल्या आहारात फळांचा नक्कीच समावेश करावा असे औषध तज्ञ डॉक्टर पंकज वर्मा सांगतात. पण फळे खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणा मध्ये फळे रिकाम्या पोटी खाऊ शकता की नाही हे तज्ञांकडून जाणून घेऊ.
गरोदर असताना रिकाम्या पोटी फळे खाणे सुरक्षित असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून रिकाम्या पोटी फळे खातात तेव्हा तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. फळे खाल्ल्याने पचन सुलभ होते. याशिवाय फळे तुम्हाला आवश्यक फायबर देखील फळांमधून मिळते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
फळे तुमच्या शरीरात डिटॉक्सिफिकेशनचे काम करतात आणि रक्तातील साखर संतुलित ठेवतात. पण आंबट फळे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये. आंबट फळे पोटात ऍसिड वाढवू शकतात. त्यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते.
केळी, सफरचंद आणि पपई ही फळे गरोदरपणात खाणे सुरक्षित मानले जाते. ही सर्व फळे पचायला सोपी असतात आणि स्त्रीच्या शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात. मात्र तज्ञांकडून डायट चार्ट बनवून घेतल्यानंतर तुमच्या आहारात फळांचा समावेश करा.
गरोदर असताना कोणती फळे खाणे फायदेशीर आहे हे जाणून घेण्यासोबतच फळे योग्य वेळी आणि योग्य मार्गाने खाणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी फळे खाण्यापूर्वी आपण सकाळी पाणी पिऊ शकता. जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. नंतर फळे खाल्ल्यानंतर काही वेळाने नाष्टा करा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि पोषणही चांगले राहते.