Alankrita Singh : IPS ची नोकरी अर्धवट सोडून अचानक लंडन गाठलेल्या महिला अधिकारी...
Sarkarnama February 04, 2025 01:45 AM
IPS Alankrita Singh स्वप्न

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका महिला IPS अधिकाऱ्यानं त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

IPS Alankrita Singh अलंकृता सिंह

युपी केडरच्या आयपीएस अधिकारी अलंकृता सिंह यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आणि हा राजीनामा शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.

IPS Alankrita Singh जमशेदपूरच्या रहिवासी

अलंकृता या मूळच्या झारखंडमधील जमशेदपूरच्या रहिवासी आहेत.

IPS Alankrita Singh आयपीएस अधिकारी

2002 ला त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून एमएससीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर 2008 ला UPSC ची परीक्षा उत्तीर्ण करत त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

IPS Alankrita Singh पोलीस अधीक्षक

1 वर्षाच्या ट्रेनिंगनंतर त्यांना यूपी केडर मिळालं. यानंतर त्या अनेक जिल्ह्यांत तैनात होत्या. बऱ्याच दिवस त्या सुल्तानपूरमध्ये पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या.

IPS Alankrita Singh डेप्युटी डायरेक्टर

2017 नंतर अलंकृता लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमीवर डेप्युटी डायरेक्टर या पदावर कार्यरत होत्या.

IPS Alankrita Singh दीड महिना सुट्टीवर

5 एप्रिल 2020 च्या नंतर त्यांना पुन्हा एकदा युपीला महिला बाल सुरक्षा विभागात एसपी पदावर पाठवण्यात आले. यानंतर त्या अचानक दीड महिना सुट्टीवर गेल्या होत्या.

IPS Alankrita Singh निलंबन

20 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्या कामावर न आल्याने शासनाच्या परवानगी शिवाय परदेशात गेल्याने एप्रिल 2022 मध्ये त्यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केले गेले.

IPS Alankrita Singh खासगी क्षेत्रात

शासनाने निलंबित करताच त्यांनी विभागाला त्यांचा राजीनामा पाठवला. अलंकृता यांना खासगी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने त्या लंडनला गेल्या आहेत.

NEXT : असाही योगायोग; पत्नीची बदली अन् त्याच पदावर झाली पतीची नियुक्ती; कोण आहेत 'हे' IPS दाम्पत्य?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.