Kharghar Helmet Attack: बाईकस्वारानं कार चालकाच्या डोक्यात केले हेल्मेटने आघात! पोलीस ठाण्यात पोहोचताच झाला मृत्यू
esakal February 04, 2025 06:45 AM

Kharghar Helmet Attack: नवी मुंबईतील खारघर येथील उत्सव चौक परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत एका इसमाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या वाहनानं कट मारल्यानं हा वाद उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुचाकीवरील व्यक्तीनं कार चालकाला जाब विचारताना थेट हल्लाच चढवला. सातत्यानं डोक्यातहेल्मेटनं मारत राहिल्यानं यामध्ये कार चालकाच्या मेंदूला जबर दुखापत झाली. या मारहाणीची तक्रार नोंदवण्यासाठी जखमी व्यक्ती खारघर पोलीस ठाण्यात पोहोचताच त्याचा जागीच मृत्यू झाला.

शिवकुमार शर्मा असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पीडित व्यक्तीच्या डोक्यात हेल्मेट मारणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरुन फरार झाला आहे, मात्र या मारहाणीचं कोणीतरी मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यानं त्यात तो व्यक्ती स्पष्टपणे दिसत आहे.

खारघर पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.