Viral Video: पुणेकरांची मेट्रोत भन्नाट मस्ती, तरुणांनी केलं असं काही की हसून हसून लोटपोट व्हाल; पहा VIDEO
Saam TV February 04, 2025 04:45 PM

Pune Metro Boys Video: सोशल मीडियावर बऱ्याच पुणेकरांचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात.ज्या व्हायरल व्हिडिओची चर्चा जगभर होते.पुणेरी पाट्या आजवर प्रसिद्ध झाल्या मात्र पुणेकर कधी काय करतील याचा कोणालाही अंदाज लागत नाही.सध्या अशाच एका पुणेकरांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

मुंबई आणि दिल्ली शहरास पुण्यातही मेट्रोची सेवा कार्यरत आहे.पुणेकर मोठ्या संख्येने याचा वापर करत असतात.मेट्रोतील प्रवासा दरम्यान पुणे मेट्रोत अनेक गंमती घडतात.सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतोय तोही पुणे मेट्रोतील आहे. जो (Viral) व्हिडिओ पाहून नक्कीच तुमला तुमचे हसणे आवरता येणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला पुणे मेट्रो दिसत आहे.मेट्रोमध्ये अनेक प्रवाशी आहेत,ज्यामध्ये काही तरुण दरवाजाजवळ उभे असतात.ज्या वेळेस स्टेशनजवळ येणार असते,त्या वेळेस मेट्रोमध्ये जी अनाउन्समेंट होते,त्याची गंमतशीर नक्कल करतात.व्हिडिओ पाहिल्यानंतर अतिशय मजा घेत तरुण त्या आवाजाची नक्कल करतात.तरुणांची ही करामत पाहून तेथील अनेकजण हसत आहेत.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

पुणेकरांचा हा (Video) 'punerikataa' या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे शिवाय कॅप्शनमध्ये,''पोरांनी तर नादच केला''असे लिहिण्यात आलेले आहे.ऐवढेच नाही तर बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''पोर काय करतील सांगता येत नाही''तर अन्य यूजर्संनी कमेंटबॉक्समध्ये हसण्याचे इमोजी दिलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.