Anjali damania allegation dhananjay munde fraud nano yuria and nano dap
Marathi February 04, 2025 06:24 PM


मुंबई : मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खळबळजनक आरोप केला आहे. मुंडे कृषीमंत्री असताना नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. 92 रूपयांची नॅनो युरियाची बॅग 220 रूपयांना धनंजय मुंडेंनी घेतली, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

अंजली दमानिया म्हणाल्या, “तत्कालीन कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कायदा पायदळी तुडवून किती खातात, कसे खातात, याचे मी पुरावे देणार आहे. नॅनो युरिया, नॅनो डिएपी आणि बॅटरीचे फवारणी यंत्र, मेटाल्ट डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठी बॅगा खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे.”

हेही वाचा : ‘शिवराय लाच देऊन आग्र्याहून सुटले होते,’ मराठी अभिनेतेच्या विधानावर छगन भुजबळ संतापले; म्हणाले…

88 कोटींचा घोटाळा 

“नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी हे एकाच कंपनीचे प्रोडक्ट आहेत. धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली 92 रूपयांना मिळणारी ‘नॅनो युरियाची’ बाटली 220 रूपयांना विकत घेतली. 269 रूपयांना मिळणारी ‘नॅनो डीएपी’ची बाटली 590 रूपयांना खरेदी केली आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा या दोन्ही वस्तूंचा घोटाळा फक्त 88 कोटींचा आहे.”

भ्रष्टाचार म्हणायचे का काय म्हणायचे?

“बॅटरीचे फवारणी यंत्र 2450 रूपयांना घेऊन हेच ‘एमएआयडी’सीच्या संकेतस्थळावर 2946 रूपयांना विकले जात आहे. परंतु, तत्कालीन कृषीमंत्री मुंडेंनी याची 3425 रूपयांना खरेदी केली होती. याला भ्रष्टाचार म्हणायचे का काय म्हणायचे? तुम्ही एक फवारणी यंत्रातून एक हजार रूपये कमावले आहेत. 2 लाख 36 हजार 427 बॅटरी फवारणी यंत्र खरेदी केले होते. त्यासह गोगगायींचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी मेटालडायहाइड हे वापरले जाते. हे 817 रुपयांना मिळते. पण, धनंजय मुंडेंनी एक लाख 96 हजार किलो मेटालडायहाइड हे 1275 रूपये किलोप्रमाणे विकत घेतले,” अशी माहिती दमानिया यांनी दिली.

मुंडेंचे मंत्रिपद ठेवण्याची गरज आहे का?

“6 लाख 18 हजार कापूस गोळा करण्याच्या बॅगा खरेदी केल्या गेल्या. 577 रूपयांना मिळणारी बॅग धनंजय मुंडेंनी 1250 रूपयांना खरेदी केल्या. इतके महान कृषीमंत्री एकच वर्षे त्या पदावर होते. एका वर्षात मुंडेंनी इतका अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल, तर त्यांचे मंत्रिपद ठेवण्याची आज गरज आहे का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार करण्याची गरज आहे,” असं अंजली दमानिया यांनी म्हटले.

आधीच ठरवले होते का निविदा कुणाला द्यायची?

“धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली कंत्राट निघण्यापूर्वीच संपूर्ण रक्कम दिली गेली. ती कशासाठी तर कच्चा माल विकत घेण्यासाठी 16 मार्चला पैसे दिले. त्यात असे लिहले गेले की कच्चा माल विकत घेण्यासाठी हे पैसे देण्यात आले. याची निविदा 30 मार्च 2024 मध्ये काढण्यात आली. बॅटरी फवारणी पंपाचे पैसे 28 मार्चला दिले, तर त्याची निविदा 5 एप्रिलला काढण्यात आली. म्हणजे तुम्ही आधीच ठरवले होते का निविदा कुणाला द्यायची?” असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : बीडच्या त्या कामांची होणार पक्षांतर्गत चौकशी, खुद्द अजित पवारांनी दिले आदेश



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.