Pune Viral Video: भयंकर! बाईकवरचा ताबा सुटला, रस्त्यावरच्या तरूणाला घेऊन गाडीला धडकला
Saam TV February 04, 2025 09:45 PM

Pune Accident Video: रस्ते अपघातांचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर पाहण्यास मिळत असतात.घडलेले अपघात अनेकदा वाहन चालकाच्या चुकीमुळे घडतात तर काही अपघात रस्त्यावरुन जात असलेल्या नागरिकांमुळे होतात.सध्या पुणे येथील एका घडलेल्या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेला आहे.जो अपघात पाहून अक्षरश:प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल.

तीन दिवसापूर्वी (Pune) शहरातील कर्वेनगर येथील एक युवक रोड वरून जात असताना एका बाईक चालकाने युवकाला जोरदार धडक दिली. रस्त्यावर उभ्या असल्या कारवर पाठीमागून फेकला गेला. फुटपाथ आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्वांना दिलेल्या असतानाही अशा पद्धतीने अपघात होत आहेत.या संदर्भात वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे.

(Viral) होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तुम्हाला रस्त्यावरुन अनेक वाहनांची येजा दिसत आहे.अशात त्या रस्त्यावरुन तुम्हाला दोन तरुण चालत येताना दिसत आहे.काही क्षणानंतर तरुणांच्या पाठीमागून एक तरुण चालत येत असतो.दरम्यान अवघ्या काही सेंकदात एक बाईकस्वार त्या रस्त्यावरुन येतो आणि तरुणाला जोरदार धडक मारतो.बाईक स्वार थेट रस्त्याकडेला असलेल्या गाडीवर त्याचे डोके आपटले जाते.अपघाताचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे

व्हिडिओ सर्व 'saamtvnews' या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेले आहे.शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''वारंवार अशा अनेक घटना घडत आहेत''तर काहींनी भावूक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.