बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' म्हणून प्रेक्षकांच्या म्हणत स्थान मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड तर लावलंच. सोबतच तिच्या सौंदर्याने तिने त्याकाळच्या अनेक अभिनेत्रींना पाणी पाजलं. तिचे कित्येक चित्रपट हिट ठरले. मात्र चित्रपटांसोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यही कायम चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलं. सप्टेंबर महिन्यात तिने आपण पतीपासून वेगळं होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यामागील कारण तिने सांगितलं नव्हतं. आता तिच्या वाढदिवशी या घटस्फोटाची दुसरी बाजू जाणून घेऊया.
उर्मिलाने मोहसीन अख्तर मीर या काश्मिरी बिझनेसमनसोबत लग्नगाठ बांधली होती. मोहसीन आणि उर्मिला यांनी ३ मार्च २०१६ रोजी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या ८ वर्षांनी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर सगळेच चकीत झाले. उर्मिलाने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल अनेक चर्चा आणि तर्क वितर्क सुरू झाले. मात्र रेडिटवर बॉलिवूड सेलेब्रिटी पेजने केलेल्या एका पोस्टवरून एक मोठा खुलासा झाला आहे.
by in
उर्मिलावर तिच्या पैशांसाठी सासरच्या लोकांकडून दबाव टाकण्यात येत होता असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय. या पोस्टमध्ये लिहिण्यात आल्याप्रमाणे, उर्मिला आणि तिच्या पतीमध्ये वय आणि पैसे या दोन्ही मुद्द्यांवरून वाद होत होते. सासरी तिचा शारीरिक छळ होत असल्याचं देखील यात लिहिलंय. मोहसीन तिच्याशी योग्य पद्धतीने वागत नव्हता शिवाय. त्याच्या बिझनेसमध्ये लावण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता. तिला तिच्या वस्तू विकून त्याच्या बिझनेससाठी पैसे मागत होता.
त्यात पुढे लिहिलंय, तिने निवडणुका होण्याची वाट पाहिली. मात्र शेवटी तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या पोस्टवर अनेकांनी आपली मतं व्यक्त केलीयेत आणि ही गोष्ट खरी असल्याचं म्हटलंय. यावर उर्मिलाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या उर्मिला सिनेसृष्टीपासून दूर आहे.