intra-party inquiry into the corruption in Beed
Marathi February 05, 2025 03:24 AM


कथित बोगस बिलाप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले असून नियोजन विभागाची समिती आठवड्याभरात याचा अहवाल सादर करणार आहे. एवढेच नव्हे तर, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची पक्षांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठीदेखील अजित पवार यांनी एक समिती नेमली आहे.

मुंबई : बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून विरोधकांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना घेरले असतानाच आता बीडमधील काही कामांची चौकशी करण्यात येणार आहेत. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीच हे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विकासकामे न करतात तब्बल 73 कोटी रुपये लाटल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्याअनुषंगाने नियोजन विभागाबरोबरच पक्षांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. (Munde on radar: intra-party inquiry into the corruption in Beed)

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी लावून धरली आहे. अशातच बीड जिल्ह्यातील बोगस बिलांचे प्रकरण समोर आले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊतांचे टीकास्त्र; संसदेचा मॅरेज हॉल करुन टाकला

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, धनंजय मुंडे 2021 ते 2022 या काळात कुठलीही विकासकामे न करतात 73 कोटी रुपये लाटल्याचा मुद्दा सुरेश धस यांनी मांडला होता. त्यावर अजित पवार यांनी, तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याची लेखी तक्रार करा, असे सांगितले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना धस म्हणाले की, याबाबत लेखी तक्रार मी केली नव्हती. आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले असून नियोजन विभागाची समिती आठवड्याभरात याचा अहवाल सादर करणार आहे. एवढेच नव्हे तर, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची पक्षांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठीदेखील अजित पवार यांनी एक समिती नेमली आहे.

कथित बोगस बिलांची प्रकरणे

  • 30 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अंबाजोगाई, 2 कोटी 31 लाख रुपयांचे बील उचलले.
  • 18 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, बीड, 10 कोटी 98 लाख रुपयांचे बील उचलले.
  • 25 मार्च 2022 कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबेजोगाई, 6 कोटी 59 लाख रुपयांचे बील उचलले.
  • 26 मार्च 2022 कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद क्रमांक 2, 16 कोटी 48 लाख रुपयांचे बील उचलले.
  • 31 मार्च 2022 कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बीड, 1 कोटी 34 लाख रुपयांचे बील उचलले.
  • अर्थसंकल्पीय तरतुदींअंतर्गत 59 रस्त्यांच्या कामासाठी 6 कोटी मंजूर
  • परळी, कूस, बर्दापूर या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये उचचले

हेही वाचा – मराठी : महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची दांडी



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.