मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगरानी यांनी अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महापालिकेचा 2025-26 चा 74427.41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढला आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ करण्यात आला आहे.
मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे बजेट 74 हजार 427 कोटी इतकं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्के वाढ आहे. 2024-25 च्या बजेटमध्ये 65 हजार 180 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. कचरा संकलन कर संदर्भात अद्याप निर्णय नाही, कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
रस्ते व वाहतूक खात्याकरिता 2025- 26 या अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 5100 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 2025- 26 चा अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 4300 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद केलीय.
मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी आहे.
मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये असेल.
मिशन व्हिजन 27, मिशन संपूर्ण हे दोन मिशन मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याकडून राबवले जाणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार आहे.
झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना कर लागणार आहे. झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे 350 कोटी इतका महसूल अपेक्षित आहे.
मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर करण्यात येतो. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार आहे. यातून सुमारे 350 कोटी इतका महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे.
– राणी बागेचं नवं आकर्षण म्हणून राणी बागेत पेंग्वीन आणि वाघांनंतर जिराफ; झेब्रा; सफेद सिंह; जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत.
– मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देण्यात येणार आहेत.
– संजय गांधी नॅशनल पार्क च्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारले जाणार आहेत.
– लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहेत.
– काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार आहे.
मुंबई महानगर पालिकेकडून 2012-13 पासून जानेवारी 2025 पर्यत बेस्ट उपक्रमास 11304.59 कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. 2025-26 मध्ये 1000 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
पर्यावरण खात्याकरिता 113.18 कोटी इतकी तरतूद
वायु प्रदूषण नियंत्रणाच्या तरतुदींच्या कठोर अंमलबजावणीसाठी बांधकाम प्रकल्पांसाठी 28 मुद्द्यांची मार्गदर्शक सूचना
28 मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीची सुनिश्चित करण्याकरिता विभाग स्तरावर अभियंता क्लीन अप मार्शल आणि पोलिस यांचा समावेश असलेली 95 पथके तयार करण्यात आली आहेत.
मुंबई शहराच्या वाढत्या गरजांकरिता महापालिकेने पाणीपुरवठा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन
सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 5545 कोटी व मल निसारण प्रचालन साठी 2477 कोटी यांचा समावेश असलेली 13457 कोटी इतकी तरतूद
या गुंतवणुकीतून पाणीपुरवठा वाढण्यासह मागणी पुरवठ्यातील दरी कमी होऊन शाश्वत मरनिश्चन व्यवस्थापन होईल त्यामुळे समृद्ध व आरोग्यदायी भविष्य सुनिश्चित होईल.
राज्य शासनाकडून येणे असलेली थकबाकी
राज्याच्या शिक्षण विभागाकडून अधिक थकबाकी
राज्य शासनाकडून मुंबई महानगर पालिकेला सहायक अनुदान, मालमत्ता कर, इत्यादीच्या माध्यमातून 31 डिसेंबर 2024 पर्यत एकूण 9750.23 कोटी रुपये थकबाकी येणे बाकी…
यामध्ये राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानपोटी 6581.14 कोटी रुपये येणे बाकी असल्याची पालिकेची माहिती
इतर बातम्या :
अधिक पाहा..