पराग ढोबळे
नागपूर : उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी कुटुंब गेल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश करत चोरी केली. चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला आला. घरात प्रवेश करतानाच्या चोरट्यांचा हालचाली घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत.
च्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या प्रमाण वाढले आहे. शहरात मागील काही दिवसात दोन ते तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. बंद घरांना टार्गेट करत चोरटे घरातून ऐवज लांबवत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान नागपूर शहरात मागील काही दिवसात वाढत्या घटना रोखण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. यातच आणखी एक चोरीची घटना घडली असून यात जवळपास पाच लाखाचा ऐवज लांबविला आहे.
पांडे कुटुंब कुंभमेळ्यात
नागपुरातील राकेश पांडे यांच्या घरात ची घटना घडली आहे. दरम्यान राकेश पांडे हे सहकुटुंब प्रयागराज येथे कुंभमेळ्यात घराला कुलूप लावून गेले आहेत. घरी कोणी नसल्याच्या संधीचा फायदा उचलत अज्ञात चोरांनी त्यांच्या घरातील खिडकीतून प्रवेश केला. यानंतर आलमारीतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. दरम्यान पांडे कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद
घरात चोरी झाल्यानंतर पांडे कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली. दरम्यान चोरी करण्यासाठी घरात प्रवेश करताना चोरटा घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांकडून त्याचा तपास तांत्रिक पद्धतीने आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी सुरू केला आहे. अज्ञात चोरटा हा सर्राइत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.