सध्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत सरकारवर जोरदार टीका केली. महाकुंभात हजारो लोक मारले गेले असा दावा त्यांनी केला. यावेळी सभागृहात एकच खळबळ उडाली. यावेळी अध्यक्ष बोलत असतानाच एका सदस्याने उठून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा खरगे यांनी त्याच्यावर राग व्यक्त करताना, तुझ्या बापाबरोबर देखील येथे मी काम केलंय, गप्प बस्स, असे म्हटल्याचा आता व्हिडिओ समोर येत आहे.
Kolhapur City Limits Extension : कोल्हापूर शहरात विकासायोग्य जगेची कमीकोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. हद्दवाढ कृती समिती आणि हद्दवाढ विरोध कृती समिती आमने-सामने आल्या असून राजकीय नेते मात्र आपल्या आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत. आता एका सर्वेक्षणातून हद्दवाढ झाली नसल्याने कोल्हापूर शहराच्या विकासालाच खिळ बसल्याचे समोर आले आहे. येथे विकासायोग्य जगेची कमी असल्याचे उघड झाले आहे.
Varanasi Live : गंगा नदीतील बोटींग आज बंदगंगा नदीतील आज देखील बोटींग बंद ठेवण्यात आली आहे. येथे बोट मालकांनी पोलिसांवर आरोप केले असून ज्यांना तुरुंगात टाकले आहे, त्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. तर आता सोमवारपर्यंत बोटींग बंद ठेवण्यात येणार आहे.
Mumbai Budget 2025: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणारदेशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकामुळे या बजेटकडे मुंबईकराचं लक्ष लागून राहिलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाच ते दहा टक्क्यांनी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची माहिती आहे. पालिकेकडून कचरा शुल्काची घोषणा बजेटमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी आज संपणार , पुन्हा जेल की बेल?मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर राज्याचे वातावरण तापलं आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड यांची कोठडी आज संपणार आहे. जामिनासाठी तो न्यायालयात अर्ज करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आज वाल्मिकच्या कोठडीत वाढ होणार की तो जामिनावर बाहेर येणार, हे दुपारी समजेल.
Mumbai News : देशमुख हत्या प्रकरणाबाबतचे पुरावे सादर करणारमस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येबाबत सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज त्या देशमुख हत्या प्रकरणाबाबतचे पुरावे सादर करणार आहेत, हे पुरावे पाहिल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास जनता भाग पाडेल, अशी आशा दमानिया यांना आहे.