मुंबई : दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा विश्वासू अशी ओळख असलेल्या शांतनु नायडू (Shantanu Naidu) याला टाटा मोटर्समध्ये (Tata Motors) मोठी जबाबदारी मिळाली आहे. शांतनु आता टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर अँड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्सचा प्रमुख बनला आहे. टाटा ग्रुपनं दिलेल्या जबाबदारीमुळं आनंदी आणि भावूक होत शांतनु नायडू यानं एक पोस्ट लिहिली आहे. त्यानं लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नव्या जबाबदारीसंदर्भात आनंद व्यक्त केला आहे.
शांतनु नायडू म्हणाला, मला हे सांगताना आनंद होत आहे की मी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजक, स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्स या पदावरुन प्रवास सुरु करत आहे. मला आठवत माझे वडील पांढरा शर्ट आणि नेवी पँटमध्ये टाटा मोटर्सच्या प्लांटवरुन घरी जात होते. मी घरी त्यांच्या येण्याची वाट पाहत असे.आता हे चक्र पूर्ण झालं आहे.
शांतनु नायडू यानं 2014 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी घेतली होती. 2016 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून त्यानं एमबीए पूर्ण केलं. 2018 मध्ये शांतनु नायडू यानं रतन टाटा यांचा सहायक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रतन टाटा आणि शांतनु नायडू यांच्या मैत्रीच्या गोष्टी अनेकदा चर्चेत आल्या आहेत. एकदा रतन टाटा यांनी त्यांचा वाढदिवस शांतनु सोबत साजरा केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
ऑटोमोबाइल डिझाइन इंजिनिअर शांतनु नायडू यानं रस्त्यावरील मोकाट श्वानांनाभरधाव वाहनांच्या धडकेपासून वाचवण्यासाठी उपक्रम राबवला होता. मोकाट प्राण्यांबद्दलच्या शांतनुच्या प्रेमाविषयी माहिती घेण्यासाठी रतन टाटा यांचं त्याच्याकडे लक्ष दिलं. त्यानंतर रतन टाटा शांतनुचे गुरु, बॉस आणि मित्र बनले. रतन टाटा यांनी गुडफेलोमध्ये गुंतवणूक केली होती. हा उपक्रम भारतात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी काम करतो. 2021 मध्ये शांतनु नायडू यानं हा उपक्रम सुरु केला होता. रतन टाटा यांनी त्यांची गुंतवणूक देखील सोडून दिल्याचं आणि शांतनु नायडूचं शिक्षण कर्ज माफ केल्याचं सांगितलं जातं. याशिवाय शांतनु नायडूकडून वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी देखील उपक्रम राबवले जातात.
शंटानू नायदुची पोस्ट
इतर बातम्या :
अधिक पाहा..