टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ही मालिका फार महत्त्वाची आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा विदर्भातील नागपूर येथील व्हीसीए स्टेडियममध्ये 6 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच या मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा मानस असणार आहे. या पहिल्या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला. रोहितने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र रोहित निवृत्तीच्या प्रश्ननावरुन चांगलाच संतापलेला दिसून आला.
रोहितने त्याच्याबाबत सुरु असलेल्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना काहीच अर्थ नसल्याचं म्हटलंय. तसेच इंग्लंड विरुद्धची वनडे सीरिज आणि आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीकडे लक्ष असताना करियरबद्दल आता बोलणं हे अप्रसांगिक असल्याचं रोहितने सांगितलं.
“जेव्हा 3 वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय तेव्हा माझ्या भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. माझ्या भविष्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. मी त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी इथे आलेलो नाही. माझ्यसााठी इंग्लंड विरुद्धचे 3 सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी महत्त्वाची आहे. माझं लक्ष या सामन्यांकडे आहे. यानंतर काय होतं हे मी पाहिन”, अंस रोहितने म्हटलं.
रोहित एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.