२०२४ प्रमाणे या वर्षीही सोन्याच्या किमतींमध्ये तेजी कायम राहणार का? डब्ल्यूजीसीच्या अहवालात मोठा खुलासा
मुंबई : आयात शुल्कात कपात आणि लग्न आणि सणांशी संबंधित खरेदीमुळे २०२४ मध्ये देशातील सोन्याची मागणी वार्षिक पाच टक्क्यांनी वाढून ८०२.८ टन झाली. २०२५ मध्ये ही मागणी ७००-८०० टनांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. आता येथे प्रश्न असा आहे की जर २०२५ मध्ये मागणी २०२४ सारखीच राहिली तर या वर्षीही सोन्याचे भाव गेल्या वर्षीसारखेच मजबूत असल्याचे दिसून येईल. २०२४ मध्ये मागणी किती होती?वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) ने जारी केलेल्या अहवालानुसार २०२४ मध्ये देशात सोन्याची मागणी ८०२.८ टन होती, तर २०२३ मध्ये ती ७६१ टन होती. २०२४ मध्ये सोन्याच्या मागणीचे एकूण मूल्य ३१ टक्क्यांनी वाढून ५,१५,३९० कोटी रुपये झाले. २०२३ मध्ये ते ३,९२,००० कोटी रुपये होते. WGC चे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत) सचिन जैन म्हणाले की, २०२५ साठी सोन्याची मागणी ७००-८०० टनांच्या दरम्यान असेल असा आमचा अंदाज आहे. जर किंमतींमध्ये काही स्थिरता असेल तर लग्नाशी संबंधित खरेदीमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. २०२५ मध्येही सोन्याच्या किंमतीत तेजी२०२४ मध्ये सोन्याच्या किमतीने विक्रमी उंची गाठली होती. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सलग पाचव्या व्यापार सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आणि ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून जोरदार मागणी असल्याने ते ५०० रुपयांनी वाढून ८५,८०० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचले. या वर्षी सोन्याचा भाव ६,४१० रुपये किंवा ८.०७ टक्क्यांनी वाढून ८५,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, जो १ जानेवारी रोजी ७९,३९० रुपये प्रति १० ग्रॅम होता. डिसेंबर तिमाहीची आकडेवारीWGC च्या सोन्याच्या मागणीच्या ट्रेंड्स २०२४ च्या अहवालात म्हटले आहे की चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) मागणी २६५.८ टनांवर स्थिर राहिली, जी २०२३ च्या याच कालावधीत २६६.२ टन होती. २०२३ मध्ये ५७५.८ टन असलेल्या दागिन्यांची मागणी २०२४ मध्ये दोन टक्क्यांनी कमी होऊन ५६३.४ टन होण्याची अपेक्षा आहे. तसेच, २०२४ मध्ये सोन्याची आयात चार टक्क्यांनी घसरून ७१२.१ टन झाली. २०२३ मध्ये ती ७४४ टन होती. आरबीआयने केली सर्वाधिक सोन्याची खरेदीजैन म्हणाले की, याशिवाय, २०२४ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) या महत्वाच्या खरेदीदार संस्थांपैकी असलेलेल्या संस्थेने ७३ टन सोने खरेदी केले, जे २०२३ मध्ये १६ टन सोने खरेदीपेक्षा चार पट जास्त आहे. शिवाय, सोन्यासाठी मजबूत गुंतवणूक मागणीचा कल कायम राहील असा अंदाज आहे. किरकोळ गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ, डिजिटल सोने आणि नाणी आणि बारमध्ये रस दाखवत आहेत. २०२३ मध्ये काय परिस्थिती होती?दरम्यान, २०२४ मध्ये जागतिक स्तरावर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात स्थिर राहिली. जी ४,९७४ टन इतकी होती. ही मागणी २०२३ च्या तुलनेत एक टक्क्याने अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उच्च किमती, कमकुवत आर्थिक वाढ आणि वाढत्या जागतिक अनिश्चिततेमुळे दागिन्यांच्या मागणीत झालेली घट इत्यादी होय. WGC च्या अहवालानुसार, २०२३ मध्ये एकूण जागतिक सोन्याची मागणी ४,९४५.९ टन होती, जी २०२४ मध्ये वाढून ४,९७४ टन झाली.