भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात इंग्लंडने षटकात सर्व गडी गमवून 248 धावा केल्या आणि विजयासाठी 249 धावांचं आव्हान दिलं आहे. आता भारताच्या खेळीकडे लक्ष लागून आहे . या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे खेळत नाही. तर यशस्वी जयस्वालचा हा पदार्पणाचा सामना आहे. त्यामुळे सलामीला येणाऱ्या यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. रोहित शर्मा फॉर्म मागच्या काही सामन्यात गेलेला दिसून आला. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्मा कशी खेळी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. फिलीप साल्ट आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 75 धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी फुटली आणि इंग्लंडचा डाव घसरला. फिलीप सॉल्ट 43 धावांवर असताना धावचीत झाला. त्यानंतर बेन डकेट आणि हॅरी ब्रूकला हार्षित राणाने तंबूत पाठवलं. एका षटकात दोन विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं.
हार्षित राणाने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 53 धावा देत 3 गडी बाद केले. तसेच एक षटक निर्धाव टाकलं. पण एका षटकात डकेटने 26 धावा ठोकल्याने इकोनॉमी रेट बिघडला. त्यानंतर रवींद्र जडेजानेही आपल्या फिरकीच्या जोरावर इंग्लंडला गुंडाळलं. त्याने 9 षटकात एक षटक निर्धाव टाकत 26 धावा देत तीन गडी बाद केले. तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हार्दिक पांड्याची झोळी मात्र रिकामी राहिली. इंग्लंडकडून जोस बटलर आणि जेकोब बेथेलने अर्धशतकी खेळी केली.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (डब्ल्यू), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.