महिला चाहत्याला किस करण्याच्या व्हिडिओवरून सध्या चर्चेत असलेल्या गायक उदित नारायण यांच्यावर आता उर्फी जावेदने देखील टीका केली आहे. 'तो आता ६९ वर्षांचा आहे. त्याच वयच तसं आहे.' अशी मिश्किल टीका उर्फीने एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. स्पष्ट मतांसाठी आणि वेगळ्या फॅशनसाठी उर्फी जावेद ओळखली जाते.
अलिकडच्या ज्येष्ठ गायक उदित नारायण यांनी एका कार्यक्रमात फोटो काढण्यासाठी आलेल्या आपल्या महिला चाहतीला कीस केलं होतं. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ वर व्हायरल होत आहे. त्यावरून उदित नारायण यांच्यावर टीका होत आहे. या लिप किस वादावर सर्वच स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. स्वत: उदित नारायण यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे.
उदित नारायण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या किस व्हिडिओमुळे चर्चेत आहे. यामध्ये ते त्यांच्या महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहेत आणि त्यापैकी एकीला लिप किस देखील दिले होते. त्या व्हिडिओवर अनेक गायकांनी उदितचा बचाव केला आहे, तर नेटकऱ्यानी मात्र त्यांना ट्रॉल केलं आहे. आता यावर ची प्रतिक्रिया आली असल्याने तिनेही या वादात उडी घेतली असल्याचं बघायला मिळत आहे. उदित नारायण आता ६९ वर्षांचे आहेत. हे त्यांच वयच आहे, असं तिने म्हंटलं आहे.
दरम्यान, उर्फीने तिच्या खास व्यंग्यात्मक शैलीत केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चेत भर पडली आहे. नेटकऱ्यांनी तिच्या विधानावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना ते मजेदार वाटले. तर काहींनी वाद हलका केल्याबद्दल तिच्यावर टीका केली.
उदित नारायण काय म्हणाले?उदित नारायण एका चाहत्याला चुंबन घेताना दाखवणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद सुरू झाला, ज्यामुळे ऑनलाइन वादविवाद सुरू झाले. स्वतःचा बचाव करताना गायक उदित नारायण यांनी सांगितले की, 'चाहते इतके भावनिक असू शकतात. पण आपण असे नाही; आपण सभ्य लोक आहोत. काही लोक अशा प्रकारे त्यांचे प्रेम व्यक्त करतात. त्यातून मोठी गोष्ट काढण्याचा काय अर्थ आहे? चाहत्यांना असे वाटते की त्यांना आपल्याला भेटण्याची संधी मिळत आहे, काही हस्तांदोलनासाठी हात पुढे करतात, काही हातांचे चुंबन घेतात. हे सर्व त्यांच्या भक्तीचा भाग आहे. याकडे इतके लक्ष दिले जाऊ नये, असं उदित नारायण यांनी म्हटलं होतं.